पिंपरी : जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर शुक्रवारी पुण्यात जो हल्ला झाला त्याचा निषेध पिंपरी चिंचवड श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष सुनील लांडगे यांनी केला आहे.
वागळे यांच्यावरील हल्ला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला आहे. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. पत्रकारांवरील हल्ला म्हणजे लोकशाहीवरील हल्ला आहे. पुरोगामी महाराष्ट्रात लोकशाहीवरील हल्ला खपवून घेतला जाणार नाही. निखिल वागळे लोकशाही मार्गाने आपले विचार जनतेपुढे मांडत आहेत. गाडी फोडून, निखिल वागळे यांच्यावर हल्ला करणे या पद्धतीने त्यांच्या विचारांना विरोध करणे निषेधार्ह आहे. असे लांडगे यांनी म्हटले आहे.
वागळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा पिंपरी चिंचवड श्रमिक पत्रकार संघाने केला निषेध
Reviewed by ANN news network
on
२/१०/२०२४ ०८:११:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
२/१०/२०२४ ०८:११:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: