'व्हॅलेन्टाईन्स डे' विशेष रोमँटिक चित्रपट ‘एक ती’ 'अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर!

 

मुंबई : महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांचं फेब्रुवारीच्या गुलाबी थंडीत उबदार मनोरंजन करण्यासाठी ‘एक ती’ चित्रपटाचा 'व्हॅलेन्टाईन्स डे'चे औचित्यसाधून ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर करण्यात आला. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमर सुनील पारखे यांनी केले असून चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेते विजय कदम, अनिकेत केळकर तसेच शेषपाल गणवीर, हर्ष गावडे आणि रूपाली जाधव हे नवोदित कलाकार चित्रपटात हटक्या भूमिकेत ओटीटी प्रेक्षकांचे बेमालूम मनोरंजन करीत आहेत.

व्यक्ती आवडणं. प्रेम व्यक्त करणं. प्रेमात बेधुंद होणं. वाट्याला विरह येणं. हे सगळं या चित्रपटात पहायला मिळणार असून या सर्व भावनांना आणखी ठळक करत, मनाचा ठाव घेणारी गाणी प्रेक्षकांना हळवं करीत आहेत. कष्टाळू आणि जबाबदार युवक ते निधीच्या प्रेमात वेडा झालेल्या विनयचा वेड्यांच्या इस्पितळात जाण्यापर्यंतचा प्रवास चित्रपटात पहायला मिळणार आहे.

“प्रेमाने जग जिंकण्याएवढी ताकत असते असं म्हणतात, अशाच प्रेमातून आजच्या युवकांना आयुष्यातील एक प्रेरणादायी धडा शिकवणारा चित्रपट ‘एक ती’ प्रदर्शित करताना मन हर्षित होत आहे. अशा प्रकारचे दर्जेदार चित्रपट 'अल्ट्रा झकासवर' संकलित करण्याचा आमचा कायम प्रयत्न आहे.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटेडचे सी.इ.ओ. श्री.सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.


'व्हॅलेन्टाईन्स डे' विशेष रोमँटिक चित्रपट ‘एक ती’ 'अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर! 'व्हॅलेन्टाईन्स डे' विशेष रोमँटिक चित्रपट ‘एक ती’  'अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर! Reviewed by ANN news network on २/१३/२०२४ ११:०७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".