‘अंत्योदय’ संकल्प साकारण्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय याचे कार्य आदर्शवत : शंकर जगताप


 भाजपतर्फे पंडित दीनदयाल उपाध्याय यांना पुण्यतिथी निमित्त आदरांजली


पिंपरी : सेवा, सुशासन आणि विकास यातून ‘अंत्योदय’ संकल्प साकारण्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी  दिलेली मूल्ये आपल्या कर्तव्याचा मार्ग बनून मार्गदर्शन करतात. त्यांचे कार्य नेहमीच आदर्शवत ठरणारे आहे, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) अध्यक्ष शंकर जगताप यांनी केले. अखंड मानवतावादाचे प्रणेते आणि कुशल संघटक आदरणीय पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजप पक्ष कार्यालयात रविवारी आदरांजली अर्पण करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी, वरिष्ठ उपाध्यक्ष तथा प्रवक्ते राजू दुर्गे, सरचिटणीस शीतल शिंदे, अजय पाताडे, मंडल अध्यक्ष प्रसाद कस्पटे, संदीप नखाते, निलेश अष्टेकर, माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे, माजी नगरसेवक यशवंत भोसले, महिला मोर्चा सरचिटणीस वैशाली खाड्ये, बेटी बचाव बेटी पढाव संयोजिका प्रीती कामतीकर, पंचायत राज जिल्हा संयोजक अभिजित बोरसे, प्रदेश सदस्य महेश बारसावडे, दत्तात्रय यादव, ज्येष्ठ नागरिक महेश कुलकर्णी, पराग जोशी, कन्हैया मुंदडा यांच्यासह  जिल्हा पदाधिकारी, सर्व मोर्चा / आघाडी / प्रकोष्ठ प्रमुख, मंडल पदाधिकारी,विधानसभा वॉरियर्स, शक्ति केंद्र प्रमुख, बुथ प्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रखर राष्ट्रवादी आणि वंचितांच्या हक्काचे निर्माते, अत्यंत साधी जीवनशैली जगणाऱ्या आणि भारतीय संस्कृतीचा प्रवाह एकत्र आणणाऱ्या दीनदयाळजींचे जीवन हजारो भाजप कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी भारतीय संस्कृती आणि वारसा केंद्रस्थानी ठेवून देशाला पुढे नेण्याचा मार्ग दाखवला. पंडित दीनदयालजी यांचे जीवन हे राष्ट्रसेवेचे आणि समर्पणाचे महान प्रतीक आहे. कोणताही देश आपल्या संस्कृतीच्या मूलभूत कल्पना विसरून प्रगती करू शकत नाही, असा त्यांचा विश्वास होता. जेव्हा जेव्हा मानवतेच्या कल्याणाचा प्रश्न येतो तेव्हा पंडितजींची अखंड मानवतावाद आणि अंत्योदयाची तत्त्वे ध्रुव तारेप्रमाणे संपूर्ण मानवजातीला मार्गदर्शन करतील. त्यांची मूल्ये पक्षासाठी नेहमीच मार्गदर्शक राहतील, असे मत व्यक्त करीत केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची माहिती “घर चलो अभियाना”च्या माध्यमातून नागरिकापर्यंत पोहोचवून खर्या अर्थाने त्यांचा आदरांजली ठरणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.  प्रसंगी ज्येष्ठ नागरिक महेश कुलकर्णी यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या कार्याचा उजाळा दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वरिष्ठ उपाध्यक्ष राजू दुर्गे यांनी केले.


‘अंत्योदय’ संकल्प साकारण्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय याचे कार्य आदर्शवत : शंकर जगताप ‘अंत्योदय’ संकल्प साकारण्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय याचे कार्य आदर्शवत  :  शंकर जगताप Reviewed by ANN news network on २/११/२०२४ ०१:०५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".