लातूर, यवतमाळ, नाशिक, सोलापूर जिल्ह्यातील अनेक संघटनांच्या कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश

 


          मुंबई : लातूर बाजार समितीचे माजी सभापती नानासाहेब देशमुखनाशिक येथील स्वामी श्रीकंठानंदपुसद नगरपालिकेचे माजी सभापती अजय पुरोहित आदींसह लातूरयवतमाळनाशिकसोलापूर या जिल्ह्यातील विविध पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या नेत्यांनीकार्यकर्त्यांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. 


भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमाला खा. सुधाकर श्रृंगारेआ. अभिमन्यू पवारप्रदेश सरचिटणीस माधवी नाईकप्रदेश सचिव नवनाथ पडळकरपदवीधर प्रकोष्ठ प्रदेश संयोजक धनराज विसपुते आदी उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार्‍यांमध्ये उमरखेड नगरपालिकेचे माजी सभापती अ‍ॅड. शैलेश मुंगेयवतमाळ जिल्ह्यातील सरपंच संघटनेचे अध्यक्ष अमोल चिकणेसोनार सेवा महासंघाचे प्रदेश अध्यक्ष लक्ष्मीकांत लोळगेमनोहर खरवडेअखिल भारतीय माळी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष राजेंद्र महाडोळेअमोल गुर्नुलेसोलापूर येथील लिंगायत महिला मंडळाच्या अध्यक्ष रंजना चकोटेअ.भा.वाल्मिकी नवयुवक संघाच्या युवक आघाडीचे अध्यक्ष आणि उल्हासनगरचे माजी नगरसेवक मोहन कंडारेसंभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हाध्यक्ष स्वप्निल इंगळेपंकज शेलारसेवानिवृत्त गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे आदींचा समावेश आहे.


नाशिक जिल्ह्यातील स्वामी श्रीकंठानंद हे रामकृष्ण आरोग्य संस्थानचे अध्यक्ष असून या संस्थेतर्फे नाशिक जिल्ह्यात आरोग्य आणि अध्यात्मिक क्षेत्रात अनेक उपक्रम राबवले जातात.

लातूर, यवतमाळ, नाशिक, सोलापूर जिल्ह्यातील अनेक संघटनांच्या कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश लातूर, यवतमाळ, नाशिक, सोलापूर जिल्ह्यातील अनेक संघटनांच्या कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश Reviewed by ANN news network on २/१३/२०२४ ०७:४२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".