पिंपरी : आम आदमी पार्टीचे पिंपरी चिंचवड शहर युवक शहराध्यक्ष रविराज काळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
प्रदेश कार्याध्यक्ष अजित फाटके यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा पाठविला असून पक्षांतर्गत मतभेदांमुळे त्यांनी राजीनामा दिला असल्याचे समजते.
शहराध्यक्ष बदलासाठी यापूर्वी २५ पदाधिकार्यांनी राजीनामे दिले होते. तरीही पक्षनेतृत्वाने पुन्हा तीच चूक केल्याने काळे यांनी राजीनामा दिला आहे.
यासंदर्भात बोलताना काळे म्हणाले, पक्षनेतृत्वाने घेतलेले निर्णय चुकीचे आणि शहरातील पक्षवाढीला मारक आहेत. यामुळे शहरातून पक्ष नामशेष होईल. नेत्यांनी वेळीच चूक सुधारावी. राजकीय वाटचालीची पुढील दिशा कार्यकर्त्यांशी चर्चा करून ठरविणार असल्याचेही ते म्हणाले.
'आप'चे रविराज काळे यांचा राजीनामा!
Reviewed by ANN news network
on
२/०४/२०२४ ०१:२९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: