१८०० विद्यार्थ्यांचा सहभाग
पुणे : भारती अभिमत विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित 'भारतीयम २०२४' या राष्ट्रीय पातळीवरील दोन दिवसीय टेक्नो कल्चरल फेस्टचे उदघाटन दि.२३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता धनकवडी शैक्षणिक संकुलात टाटा कन्सल्टन्सीचे व्यवसायवृद्धी विभागाचे प्रमुख अमित रावणकर,आयसीएफएआय बिझनेस स्कुलच्या संचालक ज्योती टिळक यांच्या हस्ते करण्यात आले.भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ . विदुला सोहोनी,उपप्राचार्य डॉ.सचिन चव्हाण,डॉ.सुनीता जाधव,डॉ.प्रमोद जाधव उपस्थित होते.वार्षिक नियतकालिकाचे,तसेच प्रकल्प प्रदर्शनाच्या तंत्र विषयक पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.
या महोत्सवात विविध प्रकारचे १४ तंत्रविषयक कार्यक्रम ,१० सांस्कृतिक उपक्रम आयोजित केले होते . त्यात हॅकेथॉन ,प्रकल्प प्रदर्शन ,पेपर प्रेझेंटेशन ,प्रश्नमंजुषा ,गटचर्चा यांचा समावेश होता .२५ अभियांत्रिकी महाविद्यालयातून १८०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले.पारितोषिक वितरण सोहळा २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आला आहे .
भारती विद्यापीठाच्या 'भारतीयम २०२४' राष्ट्रीय टेक्नो कल्चरल फेस्टचे उदघाटन
Reviewed by ANN news network
on
२/२३/२०२४ ०३:५०:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: