मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते इलेक्ट्रिक बसगाड्यांचे लोकार्पण

 

ठाणे  : एसटी बस ही राज्याची जीवनवाहिनी असून या एसटीच्या चालक-वाहकांचे गावकऱ्यांशी कायमचे ऋणानुबंधाचे नाते निर्माण झाले आहे. ग्रामीण भागाच्या विकासात एसटीचे मोठे योगदान असून काळानुरूप एसटीमध्ये अनेक बदल झाले असून आता एसटीच्या ताफ्यात ५१५० संपूर्णपणे वातानुकूलित ई-बसेस दाखल होत आहेत. या नवीन बसमुळे प्रवाशांना आरामदायक आणि पर्यावरणपूरक प्रवास करता येणे शक्य होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 

एसटी महामंडळाने  ५१५० वातानुकूलित ई-बसेस घेण्याचा धाडसी निर्णय घेतला  असून त्यासाठी राज्यभरात १७३ पेक्षा जास्त बसस्थानकांवर ई-बस चार्जिंग स्टेशन्सची निर्मिती करण्यात येत आहे.  या ३४ आसनी, वातानुकूलित ई-बसेस बोरिवली-ठाणे-नाशिक या मार्गावर धावणार असून याचा तिकीट दर सध्याच्या हिरकणी (एशियाड) बसेस सारखाच असणार आहे. विशेष म्हणजे या बसमध्ये महिलांना ५० टक्के, ६५ ते ७५ वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के तर अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के तिकीट दरात सवलत देण्यात येत आहे.  

ठाणे शहरातील खोपट बसस्थानकात आयोजित कार्यक्रमास  आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव पुसेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते इलेक्ट्रिक बसगाड्यांचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते  इलेक्ट्रिक बसगाड्यांचे लोकार्पण Reviewed by ANN news network on २/१३/२०२४ ०९:३६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".