पुणे : भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा पुणे शहर यांचे वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाती विषयी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ पुणे शहर ओबीसी मोर्चाने बालगंधर्व रंगमंदिरानजिक असलेल्या झाशीच्या राणीच्या पुतळ्याजवळ तीव्र आंदोलन केले.
पुणे शहर ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष नामदेव माळवदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.
एकसंध हिंदू समाजात फूट पाडण्याचा सतत प्रयत्न करणाऱ्या राहुल गांधी यांचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.राहूल गांधी यांचा प्रयत्न भारतीय जनता यशस्वी होऊ देणार नाही आणि काँग्रेस ला याही निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जायला लागेल असे नामदेव माळवदे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
यावेळी डॉक्टर उज्वला हाके, मंगेश शहाणे, विशाल साळी, दिलीप पवार, दिनेश रासकर, ओंकार माळवदकर, सागर धोत्रे, यशोधन आखाडे, विनोद जलगी, पल्लवी केदारी, सूर्यकांत घनवट, विकी ढोले, विक्रम फुंदे, प्रीतम नागापुरे, प्रतीक भिमाले, दत्ता गोगलू, दिनेश होले, योगेश समेळ, रवींद्र मावडीकर, निलेश जाधव, राजेंद्र पाषाणकर, संदीप कर्डेकर, सुशील आगज्ञान, मनीष साळुंखे,देवेंद्र वडके, सतीश गायकवाड, अजय तांबट, अनुराधा एडके आणि ओबीसी मोर्चाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Reviewed by ANN news network
on
२/०९/२०२४ ०९:१७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: