अशोक चव्हाणांना लॉटरी, मेधा कुलकर्णींचे पुनर्वसन
मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने गुजराथ आणि महाराष्ट्रातील उमेदवार जाहीर केले आहेत.
यामध्ये कालच काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांचा समावेश आहे. तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, गोविंद ढोलकिया, मयंक नायक, डॉ. जशवंत परमार यांना गुजरातमधून राज्यसभेची उमेदवारी दिली आहे.
महाराष्ट्रातून पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळणार अशी चर्चा होती. मात्र, त्यांना उमेदवारी दिलेली नाही. नारायण राणे यांनाही उमेदवारी देण्यात आलेली नाही. त्यांना रत्नागिरीमधून लोकसभेची उमेदवारी देण्याचा विचार पक्षनेतृत्व करत असल्याचे समजते. मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासाठी आमदारकीवर पाणी सोडावे लागलेल्या मेधा कुलकर्णी यांचे राजकीय पुनर्वसन राज्यसभेची उमेदवारी देऊन करण्यात येत आहे.
Reviewed by ANN news network
on
२/१४/२०२४ ०३:०८:०० PM
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: