डॉ. भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते ‘कलाग्राम’ प्रदर्शनाचे उद्घाटन


कलाग्राम प्रदर्शनाला उत्साहात सुरुवात

 

पुणे : कलाग्राम प्रदर्शना उत्साहात सुरुवात झाली या प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. भाग्यश्री पाटील अध्यक्षा व  व्यवस्थापकीय संचालिका - राईज एन शाईन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड व प्र- कुलपती डॉ. डी वाय पाटील विद्यापीठपुणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले.  यावेळी आयोजिका गौरी ढोलेपाटीलनुपूर पवार व मान्यवर उपस्थित होते. 

 

"कलाग्राम प्रदर्शनाच्या माध्यमातून आपली कला व उदयोग वाढविण्यासाठी हे एक व्यासपीठ आहे.  याचमुळे उद्योजकांच्या कल्पकतेला व्हावं मिळत असून यातूनच सर्वाभीमुख व्यवसायिक संवादाचे आदानप्रदान होत आहे. वस्त्रउद्योगपाककला  शिल्पकला,  हस्तकलेला 'कलाग्रामप्रदर्शनातुन पाठबळ मिळण्याबरोबरच  नवउद्योजक महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी हातभार लावला जात आहे".  असे मत डॉ. भाग्यश्रीताई पाटील यांनी  व्यक्त केले  

 

दि ३ ते ४  फेब्रुवारी रोजी आयोजित दोन दिवसीय प्रदर्शनात 55 पेक्षा अधिक स्टॉल उपलब्ध करून दिले असून भारताच्या विविध भागातून उदयोजकानी हजरी लावली आहे. आत्तापर्यंत कलाग्रामचे  40 प्रदर्शन झालेले आहेत आणि 1000 पेक्षा जास्त महिलांना स्वतःच्या पायावर उभे केले आहे. महिलांच्या सबलीकरणासाठी आणि  एनजीओला मदत करण्याच्या उद्देशाने कलाग्रामची स्थापना झालेली आहे.

 

पुण्यातील चोखंदळ क्राफ्ट प्रेमींसाठी हस्तकला वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. यामध्ये आपल्या मूळ संस्कृतीची अभिव्यक्ती असणारी कलाशिल्पकला आणि कपड्यांचे विविध संग्रहसंपूर्ण भारतातील विविध कला आणि हस्तकला  पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.  मोनालिसा कलाग्राम प्रदर्शन हे विनामूल्य असून  लेन नंबर 7 पिंगळे फार्मकोरेगाव पार्कपुणे येथे भरविण्यात आले आहे.

 

या प्रदर्शनामध्ये मध्ये  लाकूडा पासून तयार वस्तू हस्ते कलेपासून वस्त्रेगोंड कलामण्यांपासून बनलेली ज्वेलरीपश्चिम बंगालची कन्टा कढाईब्लॉक प्रिंटकढाई आणि राजस्थानचे वीणकाममध्य प्रदेशातील चंदेरी आणि माहेश्वरीबनारसी विव्ह्सउत्तर प्रदेशातील चिकन एम्ब्रॅायडीराजस्थान आणि उत्तर प्रदेशातील मातीची भांडीपश्चिम बंगालमधील लिनन साड्याओरिसाचे चांदीचे दागिने आणि अन्य ब-याच प्रकारच्या हस्तकला प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत आणि विविध शिल्पकलांनी समृद्ध असे प्रदर्शन आहे. येथे संपूर्ण भारतातील हस्तकलावस्त्रउद्योग आणि शिल्पकलेत पारंगत असलेले कलाकार त्यांचे कौशल्य प्रदर्शित करतात. लोककल्याणाच्या रोजगाराच्या संधीकलाकृतींचे प्रदर्शनखास सजावट आणि लोककलेच्या विविध कार्यक्रमांचे प्रदर्शन देखील येथे पहावयास मिळते.


डॉ. भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते ‘कलाग्राम’ प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते ‘कलाग्राम’ प्रदर्शनाचे उद्घाटन Reviewed by ANN news network on २/०४/२०२४ ०३:०८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".