बुधवार, २८ फेब्रुवारी, २०२४

खासदार मेधा कुलकर्णी यांना मातृशोक

 


मधुवंती पाटणकर यांचे निधन 

पुणे : कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या महिलाश्रम शाळेतील निवृत्त संगीत शिक्षिका मधुवंती मधुकर पाटणकर (वय 87)  संगीत शिक्षिका  म्हणून काम केलेल्या मधुवंती मधुकर पाटणकर (वय 87) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. 

कोथरूड मधील जुन्या डॉक्टरांपैकी एक डॉ. मधुकर पाटणकर यांच्या त्या पत्नी होत्या.

खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

आज दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रांतील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा