पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील चिखली, आळंदी परिसरात संघटित गुन्हेगारी कृत्ये करून नागरिकांमध्ये दहशत माजविणार्या राहुल यादव टोळीच्या ५ सदस्यांवर पोलिसांनी मोक्का कायद्याखाली कारवाई केली आहे.
राहुल प्रल्हाद यादव, (टोळी प्रमुख) वय ३२ वर्षे, रा.गट नं. ८५०, विठ्ठल रुक्मीणी मंदीराचे शेजारी, कुदळवाडी, चिखली,नागेश गुलचंद सुर्यवंशी, वय २८ वर्षे, रा. सोळु प्राथमीक शाळेजवळ, ता. खेड,रोहन भानुदास यादव, वय २१ वर्षे, रा. चंद्रभागा गोशाळेजवळ, सोनवणे वस्तीजवळ, रामदास नगर, चिखली, आशिष भिमराव बजलव, वय २७ वर्षे, रा. रॉयल प्लाजा, तिसरा मजला, फ्लॅट नं. ३०३, इंद्रायणी वजन काट्याचे शेजारी, कुदळवाडी, चिखली, राजेश बहरीच निसाद, वय ३२ वर्षे, रा. प्रथमेश पार्क सोसायटी, फ्लॅट नं. १०१, पहिला मजला, बालघरे यांचे एच.पी.पेट्रोल पंपचे समोर, कुदळवाडी, चिखली अशी कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत
या टोळीचा प्रमुख आणि इतर सदस्यांवर खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांसह खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, दंगा, मारामारी, घातक शस्त्रे जवळ बाळगणे अशा स्वरुपाचे ७ गुन्हे दाखल आहेत. काही कालावधीपूर्वी एका खुनाच्या गुन्ह्याशी या टोळीचा संबंध असल्याचे पोलिसांना दिसून आले होते. त्याप्रकरणात पोलिसांनी टोळीतील काहीजणांना अटकही केली होती. त्यांच्या संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी चिखली पोलिसांनी त्यांच्याविरोधात मोक्का कारवाईचा प्रस्ताव आयुक्तालयाकडे सादर केला होता.यासंदर्भात अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी आता याटोळीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३ (४) अन्वये कारवाई करण्याचे आदेश जारी केले आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त संदिप डोईफोडे, शिवाजी पवार, सहायक आयुक्त विवेक मुगळीकर, राजेंद्रसिंह गौर, यांच्या मार्गदर्शनाखाली चिखली पोलीसठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, सहायक निरीक्षक निता उबाळे,वर्षा जगदाळे तसेच अंमलदार सचिन चव्हाण, व्यंकप्पा कारभारी, महिला पोलीस हवालदार केदार यांनी केली आहे.
सन २०२४ मध्ये आजवर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील ०४ संघटीत गुन्हेगारी टोळ्यांमधील एकूण २४ आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
Reviewed by ANN news network
on
२/२९/२०२४ ०८:४३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: