१२ लाखांचा मुद्देमाल जप्त
लोणावळा : कामशेत परिसरात खडकाळे येथील नाणे रेल्वे फाटकाजवळ एका खोलीत सुरू असलेल्या जुगारअड्ड्यावर लोणावळ्याचे डीवायएसपी सत्यसाई कार्तिक यांच्या नेतृत्वाखालील पोलीसपथकाने आज १८ फेब्रुवारी रोजी छापा घालून तेथील १० जणांना ताब्यात घेतले. या छाप्यात सुमारे १२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यात रोख रक्कम, वाहने, मोबाईल फोन्ससह रोख रकमेचाही समावेश आहे.
पोलीस कॉन्स्टेबल रईस मुलाणी यांनी या प्रकरणी कामशेत पोलीसठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून १० जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक शुभम चव्हाण पुढील तपास करत आहेत.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहायक अधीक्षक सत्यसाई कार्तिक, सहायक निरीक्षक सचिन राऊळ, उपनिरीक्षक शुभम चव्हाण, हवालदार नितेश (बंटी) कवडे, रईस मुलाणी यांनी केली.
Reviewed by ANN news network
on
२/१८/२०२४ ०९:४१:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: