पुण्यातील अल्पसंख्य, बहुजन समाजातील विद्यार्थ्यांची शिवजयंतीदिनी निघाली सर्वात मोठी अभिवादन मिरवणूक !
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चा पुढाकार
शिवजयंतीनिमित्त आझम कॅम्पस ते लाल महाल मार्गावर अभिवादन मिरवणूक
पुणे : ‘महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विद्यार्थ्याच्या भव्य अभिवादन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. सोमवार, दि. 19 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी साडे आठ वाजता संस्थेचे अध्यक्ष तसेच डॉ पी ए इनामदार युनिव्हर्सिटी चे कुलपती डॉ. पी.ए.इनामदार यांच्या हस्ते मिरवणुकीस प्रारंभ झाला. संस्थेचे सचिव प्रा. इरफान शेख, एस. ए. इनामदार, मशकुर शेख, साबीर शेख, अफझल खान, अब्दुल वहाब, शाहिद शेख, बबलू सय्यद, आसिफ शेख, डॉ. गुलजार शेख, सिकंदर पटेल,विश्वस्त, पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षक , विदयार्थी सहभागी झाले.पुण्यातील अल्पसंख्य, बहुजन समाजातील विद्यार्थी यांचा सहभाग असलेली ही सर्वात मोठी शिवजयंतीदिनाची अभिवादन मिरवणूक ठरली ! एकूण ९ हजार विद्यार्थी या मिरवणुकीत सहभागी झाले, मिरवणुकीचे हे २३ वे वर्ष होते.
आझम कॅम्पस ते लाल महाल असा या मिरवणुकीचा मार्ग होता. पूना कॉलेज, गोल्डन ज्युबिली टेक्नीकल इन्स्टिट्युट, जूना मोटर स्टँड, पद्मजी पोलिस चौकी, क्वार्टर गेट, संत नरपतगीरी चौक, नाना चावडी चौक, अरुणा चौक, अल्पना टॉकीज, डुल्या मारूती चौक, तांबोळी मशीद, सोन्या मारुती चौक, मोती चौक, फडके चौक मार्गे लाल महाल येथे मिरवणुकीची सांगता झाली. ठिकठिकाणी स्वागत झाले.मिरवणूकीत शैक्षणिक संस्थांचे सर्व प्राचार्य, पदाधिकारी, कर्मचारी, दरबार ब्रास बॅण्डची दोन पथके, ढोल-ताशांचे पथक, तुतारी, नगारे देखील सहभागी झाले.दरवर्षी संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महंमद पैगंबर यांच्या जयंतीदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी भव्य मिरवणुका काढल्या जातात.
पुण्यातील अल्पसंख्य, बहुजन समाजातील विद्यार्थ्यांची शिवजयंतीदिनी निघाली सर्वात मोठी अभिवादन मिरवणूक !
Reviewed by ANN news network
on
२/१९/२०२४ ०३:३१:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: