ग्राम परिक्रमा यात्रेच्या माध्यमातून भाजपा कार्यकर्ते २ लाख खेड्यांपर्यंत पोहोचणार

 


भाजपा किसान मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष खा. चाहर यांची माहिती

 

मुंबई :  मोदी सरकारच्या कार्यकाळातील शेतकरी हिताच्या विकास कामांची माहिती देशातील २ लाख खेड्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा तर्फे १२ फेब्रुवारीपासून ‘ग्राम परिक्रमा यात्रा’ काढण्यात येणार असल्याची माहिती किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.जगतप्रकाश चाहर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी किसान मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व प्रदेश प्रभारी बन्सीलाल गुर्जरकिसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे आदी उपस्थित होते. मोदी सरकारच्या शेतकरी हिताच्या योजनांवर चर्चा तसेच पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पपत्रासाठी शेतक-यांकडून सूचना व अपेक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न या ग्राम परिक्रमा यात्रेतून केला जाणार असल्याचे श्री. चाहर यांनी यावेळी सांगितले.

श्री.चाहर यांनी सांगितले की१२ फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगर येथील सुखदेव आश्रमाजवळ होणा-या भाजपा चे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या विशाल सभेने या यात्रेचा प्रारंभ होणार आहे. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथपक्षाचे पदाधिकारी आदी उपस्थित रहाणार आहेत. गावागावांतून गायनांगर, ट्रॅक्टर व अन्य कृषी यंत्रांची पूजा करून यात्रेला सुरुवात होणार आहे. पुढे महिनाभर चालणा-या या यात्रेदरम्यान शेतक-यांच्या कल्याणासाठी मोदी सरकारने राबवलेल्या योजनांची माहिती शेतकरीशेतमजुरांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. मोदी सरकारने शेतक-यांसाठी राबवलेल्या कल्याणकारी योजनांमुळे देशातील शेतकरी आत्मनिर्भर व समृद्ध होत आहे. मोदी सरकारच्या काळात कृषी क्षेत्राचा झालेला विकासकॉंग्रेस सरकार आणि भाजपा सरकार यांच्या कामगिरीची तुलनात्मक आकडेवारी या यात्रेदरम्यान शेतकऱ्यांपुढे ठेवण्यात येणार आहे. शेतकऱ्यांबरोबर बैठकांचे आयोजन त्याबरोबरच घरोघरी जाऊन मोदी सरकारच्या विविध योजना व विकासकामांची माहिती देणा-या पत्रकाचे वितरण केले जाईल. प्रगतीशील शेतक-यांचासैनिकांचा तसेच देशासाठी हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांचा यात्रे दरम्यान सन्मान केला जाणार आहे. 

            प्रत्येक दिवशी प्रत्येक जिल्ह्यातील पाच गावांमध्ये ग्राम परिक्रमा यात्रा आयोजित करण्यात येणार असून खासदारआमदारस्थानिक स्वराज्य संस्थांचे लोक प्रतिनिधीभाजपा जिल्हा पदाधिकारीमंडल पदाधिकारी या यात्रेत सहभागी होणार आहेत. वकीलडॉक्टरमाजी सैनिक यांनाही या यात्रेत आमंत्रित केले जाणार आहेअसेही श्री. चाहर यांनी नमूद केले.


ग्राम परिक्रमा यात्रेच्या माध्यमातून भाजपा कार्यकर्ते २ लाख खेड्यांपर्यंत पोहोचणार ग्राम परिक्रमा यात्रेच्या माध्यमातून भाजपा कार्यकर्ते २ लाख खेड्यांपर्यंत पोहोचणार Reviewed by ANN news network on २/११/२०२४ ०२:५७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".