एकूण २१० रक्तदात्यांनी केले रक्तदान
विठ्ठल ममताबादे
उरण : अनंत श्री विभुषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज, जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीज,महाराष्ट्र तर्फे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांनच्या माध्यमातून रक्ताची गरज लक्षात घेता संपूर्ण महाराष्ट्रात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.गरजूंना वेळेत रक्त उपलब्ध व्हावे,रक्ता अभावी कोणाचा मृत्यू होऊ नये या अनुषंगाने जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान तर्फे उरण तालुक्यातील इंदिरा गांधी शासकीय ग्रामीण रुग्णालय येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबिराला जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून एकूण २१० रक्तदात्यांनी रक्तदान केले.
महा रक्तदान कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक बाबासो कालेल, इंदिरा गांधी शासकीय ग्रामीण रुग्णालयाचे सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग,डॉ. डी वाय पाटील रक्त केंद्र नेरुळ नवी मुंबईचे जनसंपर्क अधिकारी प्राची नायर, डॉ. रुची पुनामिया, डॉ गौरव, डॉ. सिमरन आणि त्यांची सर्व टीम, रोटरी ब्लड बँक खांदा कॉलनी नवीन पनवेल संचालक सोपान ठोंबरे, संचालक ज्ञानेश्वर पाटील व त्यांची सर्व टीम तसेच स्व स्वरूप संप्रदायचे जिल्हा शिबीर प्रमुख दीपाली पाटील, तालुकाध्यक्ष रमाकांत बंडा, तालुका महिला अध्यक्ष त्रिवेणी ठाकूर, जिल्हा महिला कार्यकर्ता नंदा बंडा, बिन प्रमुख मीनल जोशी,पि.आर.ओ देवेश गाताडी,सातरऱ्हाटी सेवाकेंद्र अध्यक्ष जनार्दन भोईर, माजी सेवा केंद्र प्रमुख पांडुरंग भोईर,जिल्हा कमांडर संगीता पाटील,सुजीत पाटील,प्रिया पाटील व सर्व संग्राम सैनिक, सर्व युवा सेना, सर्व महिला भक्तगण यांनी विशेष मेहनत घेतली.
अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने स्व-स्वरुप संप्रदाय तर्फे दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित केले जाते.आपल्या महाराष्ट्रात सिकलसेल अनेमिया, हिमोफिलीया, थलॅसेमिआ, ब्लड कॅन्सर, किडनी फेल्युअर पेशंट जास्त आढळतात. अशा रुग्णांना वारंवार रक्ताची नितांत आवश्यकता असते. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढ्यांना रक्तबाटल्या देण्याचे आमच्या संप्रदाया मार्फत निश्चित केले आहे.त्या अनुषंगाने सर्वत्र रक्तदान शिबीरे आयोजित करण्यात आली असून उरण मध्ये आयोजित केलेल्या महारक्तदान शिबिराला जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती जागृती दर्णे-जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज प्रवचनकार भूषण यांनी दिली आहे.
जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान आयोजित रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद
Reviewed by ANN news network
on
२/१९/२०२४ ०३:४३:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
२/१९/२०२४ ०३:४३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: