मुस्लिम बँकेत डॉ.पी.ए.इनामदार यांनी केली १० हजार कोटी रुपयांची अफरातफर;डॉ. सलीम बागवान यांचा आरोप (VIDEO)

 



कारवाई न केल्यास आमरण उपोषण करण्याचा डॉ. सलीम ए. आर. बागवान यांचा इशारा 

पुणे :  शहरातील एक नामांकित शैक्षणिक संकुल अशी महाराष्ट्र कॉस्मोपोलिटियन सोसायटी  (आझम कॅम्पस) ची ओळख आहे.  डॉ. पी. ए. इनामदार यांच्या नेतृत्वाखाली संस्थेत मागील चाळीस वर्षांपासून अनेक बाबतीत अनियमितता सुरू असून यामधून कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. तसेच इनामदार यांचे वर्चस्व असलेल्या हाजी गुलाम, मोहम्मद ट्रस्ट, मुस्लिम को ऑपरेटीव्ह बँकेसह अन्य संस्थांमध्ये तब्बल 10 हजार कोटी रुपयांचा आर्थिक घोटाला झाला आहे. या बाबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्या नंतर ही कारवाई करण्यात आलेली नाही, तर काही वेळा न्यायालयीन आदेशातून पळवाट काढण्यात आलेली आहे. डॉ. पी. ए. इनामदार यांनी सर्व संस्थेतून राजीनामा द्यावा किंवा अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा युनायटेड नेशन संलग्न  इंटरनॅशनल ह्युमन राईट्स अम्बेसिडर  संघटनेचे आंतरराष्ट्रीय  उपाध्यक्ष  डॉ. सलीम ए. आर. बागवान यांनी पत्रकार परिषदेत दिला. पत्रकार परिषदेस चंद्रशेखर गव्हाने, अन्वर बागवान डाॅ. अविनाश सुकुंडे आदी होते.


पुढे बोलताना डॉ. सलीम ए. आर. बागवान म्हणाले, महाराष्ट्र कॉस्मोपोलिटियन सोसायटी  (एम. सी. ई.} पुणे रजि. नं .  एफ 121 /1948 च्या सभासदांची यादी गायब करून नवीन यादी सादर करून  डॉ. पी. ए. इनामदार यांनी धर्मादाय आयुक्तांची दिशाभूल केली आहे,  या प्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात एफआयआर नं. 0203 दि. 9 एप्रिल 2019 रोजी तक्रार दाखल केली आहे, मात्र अद्याप त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही, ती टाकायल करण्यात यावी. 

मुस्लिम को ऑपरेटीव्ह बँकेच्या सभासदांना 1985 पासून डिव्हिडंट दिला जात नाही, त्यांच्याकडून लिहून घेतले जाते कि आमचा डिव्हिडंट गोल्डन ज्युबली एज्युकेशन मध्ये जमा करून गॅरंजी मुलांना शिक्षणक्षेत्रात  द्यावे हे काम बेकायदेशीर पध्दतीने केले जात आहे. या बॅकेत एकूण 28 हजार सभासद आहेत आणि यांना 40 वर्ष  डिव्हिडंड दिला गेला नाही याचीच किंमत  सुमारे 5 हजार कोटीच्या आसपास जाते. बँकेच्या कर्मचाऱ्यांना दिले जाणारे प्रत्यक्ष वेतन, बोनस आणि दाखवण्यात येणारी रक्कम यात मोठी तफावत आहे.   बँकेच्या नवीन शाखा सुरू करणे आणि काही काळानंतर बंद करणे यातून कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार करण्यात येत आहे. नोटाबंदीच्या  काळात 5 हजार बनावट खात्यांमधून कोट्यावधी रुपयांचा घोटाला करण्यात आल्याचा आरोप करत  डॉ. सलीम ए. आर. बागवान यांनी सदरील प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. 

आझम कॅम्पस च्या 23 एकर जागेत विविध शाळा, महाविद्यालये सुरू आहेत. या ठिकाणी विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने बडे अधिकारी, देश विदेशातील नेते यांना निमंत्रित केले जाते, त्यांना गोर - गरिबांना आम्ही मोफत शिक्षण देतो असे सांगितले जाते मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. येणाऱ्या बड्या नेत्यांची, अधिकाऱ्यांची  दिशाभूल करून करोडो रुपये अनुदान मिळवले जात आहे. काही एनजीओच्या नावाखाली सुद्धा  डॉ. पी. ए. इनामदार यांनी कोट्यावधी रुपयांची संपत्ती जमवली आहे. 

डॉ. पी. ए. इनामदार यांचा मोठा मुलगा कॅनडा चा नागरिक झाला आहे. मागील चाळीस वर्षांपासून सुरू असलेल्या या आर्थिक घोटाळ्यातून मिळवलेली कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक डॉ. पी. ए. इनामदार यांनी देशाच्या विविध शहरांसाह, विदेशात मुलाकडे आणि अन्य देशात गुंतवली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावण्यासाठी माझी केंद्र सरकारच्या विविध यंत्रणांना विनंती आहे की त्यांनी  महाराष्ट्र कॉस्मोपोलिटियन सोसायटी, मुस्लिम बँक व अन्य संस्थांची चौकशी करावी, तसेच डॉ. पी. ए. इनामदार आणि त्यांचे नातेवाईक बाहेर देशात पळून जाऊ नयेत म्हणून त्यांचा पासपोर्ट जप्त करावा. 


डॉ. पी. ए. इनामदार हे एक व्हाईट कॉलर गुन्हेगार आहेत, त्यांच्यावर तत्काल कारवाई न केल्यास आपण जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा डॉ. सलीम ए. आर. बागवान यांनी दिला आहे.
मुस्लिम बँकेत डॉ.पी.ए.इनामदार यांनी केली १० हजार कोटी रुपयांची अफरातफर;डॉ. सलीम बागवान यांचा आरोप (VIDEO) मुस्लिम बँकेत डॉ.पी.ए.इनामदार यांनी केली १० हजार कोटी रुपयांची अफरातफर;डॉ. सलीम बागवान यांचा आरोप (VIDEO) Reviewed by ANN news network on २/०३/२०२४ ०५:४२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".