विठ्ठल ममताबादे
उरण : उरणचे माजी आमदार मनोहर भोईर संस्थापक अध्यक्ष असलेल्या लक्ष्मण नारायण भोईर शैक्षणिक संस्थेचे स्वातंत्र्यवीर सावरकर विद्यालय व जुनिअर कॉलेज, नवीन शेवाच्या जेएनपीटी मधून मंजूर झालेल्या सीएसआर फंडाच्या निधीतून बांधण्यात येणाऱ्या स्वच्छतागृहाचे भूमिपूजन सोहळा गुरुवार दिनांक २२ फेब्रुवारी २०२४ रोजी जे एन पी ए चे डेप्युटी जनरल मॅनेजर संजीव पगारे व सीएसआर फंड ऑफिसर सिद्धार्थ उगाडे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी संस्थेचे वतीने श्रीसंजीव पगारे व सिद्धार्थ उगाडे यांचा शाल पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह घेऊन सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमास नवीन शेवा ग्रामपंचायतच्या सरपंच सोनल घरत, उपसरपंच रेखा म्हात्रे, सदस्य वैशाली म्हात्रे, ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष कमलाकर पाटील, एम आय पी एल चे व्यवस्थापक दयालशेठ भोईर, संस्थेचे उपाध्यक्ष गणेश म्हात्रे, सचिव जगजीवन भोईर,कामगार नेते गणेश घरत,किसन म्हात्रे, अशोक म्हात्रे, मुख्याध्यापक संतोष म्हात्रे सर, म्हात्रे मॅडम, प्रशांत म्हात्रे, नायडू सर, शिक्षक वर्ग, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा