पिंपरी : प्रसिद्ध गायक शंतनु मुखर्जी उर्फ शान याला रविवारी भोईरनगर येथे झालेल्या कार्यक्रमात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेतर्फे ‘आशा भोसले पुरस्कार’ देण्यात आला. हा पुरस्कार सोहळा पिंपरी चिंचवड कलारंग प्रतिष्ठान व सिद्धी विनायक ग्रूप यांच्या सहकार्याने झाला.
यापूर्वी हा पुरस्कार गानकोकिळा लता मंगेशकर, खय्याम, रविंद्र जैन, बप्पी लहरी, प्यारेलालजी, आनंदजी, हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, अनु मलिक, शंकर महादेवन, पंडित शिवकुमार शर्मा, सुरेश वाडकर, हरीहरन, सोनू निगम, सुनिधी चौहान, पद्मभूषण उदित नारायण, रुपकुमार राठोड, अवधूत गुप्ते आणि सलील कुलकर्णी आदींना देण्यात आला आहे. पुरस्काराचे यंदाचे २० वे वर्ष होते. सन्मानचिन्ह, १ लाख ११ हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
यावेळी शान याच्या गीतांवर आधारित 'रजनीगंधा' हा कार्यक्रम झाला. तो मधुसूदन ओझा यांच्या मधुमित या संस्थेने सादर केला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: