विठ्ठल ममताबादे
उरण : उरण मध्ये शिवजयंतीच्या उत्सव साजरा करण्याबाबत शिवसेना शहर शाखेमध्ये नुकतीच बैठक बोलवण्यात आली होती, या मीटिंगमध्ये शिवसेनेची सोशल मीडियावर कणखरपणे बाजू मांडणारे कार्यकर्ते आशिष गोवारी यांची २०२४ शिवजयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली, ही निवड होताच आशिष गोवारी यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख व माजी आमदार मनोहरशेठ भोईर व माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी आशिष गोवारी यांचा सत्कार करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी उरण शहरप्रमुख विनोद म्हात्रे, संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, बोरी विभागप्रमुख वैभव करंगुटकर, प्रवीण तळी, शहर कार्यालयप्रमुख राजेश निकम, माजी अध्यक्ष संदेश पाटील, निखिल पाटील, सोहम श्रीधरधनकर,राज शिंदे, प्रफुल शहा व कार्यकर्ते उपस्थित होते.
उरण शिवजयंतीच्या अध्यक्षपदी आशिष गोवारी यांची निवड
Reviewed by ANN news network
on
२/१६/२०२४ ११:३३:०० AM
Rating:
Reviewed by ANN news network
on
२/१६/२०२४ ११:३३:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: