पुणे : फर्ग्युसन महाविद्यालयातील बायोटेक्नॉलॉजीच्या सहायक प्राध्यापिका नंदिनी कोठारकर यांना एमआयटी एडीटी विद्यापीठाने पीएच. डी. पदवी प्रदान केली. संधिवात या आजारावर उपयोगी असणाऱ्या औषधासाठी पारिजातक या झाडातील उपयुक्त घटकाचे कोठारकर यांनी संगणकीय विश्लेषण केले. डॉ. रेणू व्यास आणि डॉ. प्रणव पाठक यांनी त्यांना मार्गदर्शन केले.
ऱ्हुमॅटॉईड संधिवात या प्रकारात सांध्याच्या आजूबाजूला सूज येते आणि दाह होतो. हा एक ऑटोइम्युन आजार आहे. ज्यामध्ये प्रतिकारशक्ती कमी होत जाते. या आजारावरील औषधांच्या संशोधनात हे रसायन मदत करेल.
नंदिनी कोठारकर यांना पीएचडी
Reviewed by ANN news network
on
२/०२/२०२४ ०२:३७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: