४५ हजार चौरस फूटाचे अतिक्रमण हटविले
पिंपरी : ‘ड’ क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील नाशिक फाटा उड्डाणपूल ते कोकणे चौक या मार्गालगतच्या दुसऱ्या बाजूचे अनधिकृत पत्राशेड व बांधकामावर कारवाई करण्यात आली.सुमारे ४५ हजार चौ फूट क्षेत्राचे पत्राशेड पाडण्यात आले.
उद्या साई चौक जगताप डेअरी ते डांगे चौक या रस्त्यालगत कारवाई करणेत येणार आहे. ही कारवाई आयुक्त शेखर सिंह यांचे आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील व शहर अभियंता मकरंद निकम यांचे नियोजनानुसार करण्यात आली.
सदरची कारवाई अ, ब,ग, ड क्षेत्रिय कार्यालयाकडील चार टीम मार्फत करणेत आली. उप आयुक्त मनोज लोणकर, क्षेत्रिय अधिकारी अंकुश जाधव, अमित पंडित, अजिंक्य येळे,सुचिता पानसरे, ४ उपअभियंता ५ कनिष्ठ अभियंता, ४ बीट निरीक्षक अतिक्रमण विभागाकडील एक पोलिस अधिकारी, ५ पोलिस, ३ महिला पोलिस ८० एम एस एफ जवान वाकड पोलीस स्टेशन कडील एक पोलिस अधिकारी व पोलीस, महिला पोलीस ४ जे सी बी,१ कटर व २० मजूर उपस्थित होते.
Reviewed by ANN news network
on
२/२९/२०२४ १२:२३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: