पुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड प्रशालेत 'जपानी भाषा अभ्यास प्रकल्प' प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
जपानी भाषा अभ्यासक चंद्रशेखर राठोड यांनी प्रदर्शनाचे उद्घाटन केले. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी जपानी भाषेच्या गीत गायनाने झाली. इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी जपान मधील विविध मंदिरे, घरांची प्रतिकृती, येथील सण, आहार, चेरी ब्लॉसम महोत्सव यांची रचना करून व पीपीटीचे सादरीकरण करून प्रदर्शनाचे आयोजन केले. काही विद्यार्थी व विद्यार्थिनींनी जपानी वेशभूषा केली.
शालाप्रमुख सुनीता राव, पर्यवेक्षिका श्रीमती अनिता भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिका पूनम ढगे व शैलजा कोंपेल्ली यांनी आयोजन केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा