भाजयुमो आयोजित “नमो चषक २०२४” पारितोषिक वितरण उत्साहात

 


पिंपरी : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यभरात 'नमो चषक २०२४या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय जनता युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या अध्यक्षतेखाली तसेच चिंचवड विधानसभा आमदार अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवड विधानसभा कार्यक्षेत्रातील तानाजीनगर येथे 'श्री शिवाजी उदय मंडलव भाजयुमो सरचिटणीस शिवम डांगे यांच्या संयोजनाने “नमो चषक २०२४” स्पर्धा मोठया उत्साहात पार पडली.

या स्पर्धेतंर्गत प्रामुख्याने स्केटिंगजिम्नॅस्टिक्समल्लखांबऍथलेटिक्सरनिंगरस्सीखेचरांगोळीचित्रकलाब्रॉड जम्पज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी संगीत खुचीं आणि थ्रो-बॉल  स्पर्धा घेण्यात आल्या. आमदार अश्विनी जगताप यांनी स्पर्धेस उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढवून त्यांना प्रोत्साहित केले. या खेळात अनेक चिमुकल्यांसह तरुण खेळाडूंनीही उत्कृष्ट खेळ खेळत उपस्थितांची मने जिंकली. प्रत्येक सहभागी खेळाडूला प्रशस्तीपत्र व विजेत्यांना मेडल्स आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.

या प्रसंगीभाजयुमो महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अनुप मोरेभाजयुमो पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष तुषार हिंगेभाजयुमो प्रदेश सचिव अजित कुलथेभाजपा ज्येष्ठ नेते महेश कुलकर्णीमाजी नगरसेवक राजेंद्र गावडेमोरेश्वर शेडगेसुरेश भोईरश्री शिवाजी उदय मंडळ अध्यक्ष गोडसेभाजपा शहर उपाध्यक्ष रवींद्र देशपांडेशेखर चिंचवडेसचिव मधुकर बच्चेरावेत काळेवाडी मंडल अध्यक्ष सोमनाथ भोंडवेप्रभाग स्विकृत सदस्य विठ्ठल भोईरभाजयुमो चिंचवड विधानसभा संयोजक योगेश चिंचवडेप्रशांत आगज्ञानसांस्कृतिक आघाडी धनंजय शाळिग्रामभाजयुमो सरचिटणीस दीपक नागरगोजेसतीश नागरगोजेसचिन बंदीकार्ती क्रिश्ननभाजयुमो विद्यार्थी विभाग संयोजक कपिल अगज्ञानरवींद्र प्रभुणेप्रदीप सायकरचंद्रशेखर जोगदंडमयूर काळभोरबाळासाहेब टोनपेकरअनिकेत दळवी यांच्या भाजयुमो पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजयुमो आयोजित “नमो चषक २०२४” पारितोषिक वितरण उत्साहात भाजयुमो आयोजित “नमो चषक २०२४” पारितोषिक वितरण उत्साहात Reviewed by ANN news network on २/२२/२०२४ ०८:२५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".