ठाणे गुन्हेशाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाची कामगिरी
ठाणे : ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील अमली पदार्थ विरोधी पथकाने अमली पदार्थ तयार करून विकणारी टोळी जेरबंद केली असून त्यांच्याकडून एमडी या अमली पदार्थासह त्याची निर्मिती करण्यासाठी लागणारा कच्चा माल आणि मशिनरी असा मुद्देमाल जप्त केला आहे.
यामध्ये २१ लाख रुपये किमतेचे २१० ग्रॅम एमडी, ५९ हजार रुपयांचा एमडी बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल आणि २७ लाख रुपये किमतीची गुन्ह्यात वापरलेली वाहने यांचा समवेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २८ डिसेंबर २०२३ रोजी पोलिसांनी जयेश प्रदीप कांबळी उर्फ गोलू, वय २५ वर्षे, रा. आंबेडकर रोड, ठाणे, विघ्नेश विनायक शिर्के, उर्फ विघ्न्या, वय २८ वर्षे, रा. वर्तकनगर, ठाणे यांना ७८.८ ग्रॅम एमडी या अंमली पदार्थासह पकडले होते.त्यांच्यावर वर्तकनगर पोलीसठाण्यात २९४/२०२३ क्रमांकाने एन. डी. पी.एस. कायदा १९८५ चे कलम ८(क), २२ (क), २० (ब) ii (क)२९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास करताना पोलीसांना मिळालेल्या माहितीनुसार अहमद मोहम्मद शफी शेख उर्फ अकबर खाऊ, वय ४१ रा. कुर्ला, मुंबई, शब्बीर अब्दुल करीम शेख, वय ४४ वर्षे, रा. कुर्ला, मुंबई यांना दिनांक ०५ जानेवारी २०२४ रोजी चिंचोटी, ता. वसई, जि. पालघर येथून अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्याकडून २६ ग्रॅम एमडी हा अंमली पदार्थ व ४ किलो ८५० ग्रॅम चरस जप्त करण्यात आला होता. त्याणा अमली पदार्थ पुरविणाऱ्या मोहमद रईस हनिफ अन्सारी, वय ४७ वर्षे, रा. कुर्ला, मुंबई याला चंदनसार रोड, कोपरी, विरार (पूर्व) जि. पालघर येथून दिनांक १८जानेवारी २०२४ रोजी अटक करण्यात आली. त्याने मोहम्मद आमीर अमनतुल्लाह खान, वय ४४ वर्षे, रा. कुर्ला, मुंबई हा आपणाला अमली पदार्थ पुरवित असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी त्याला दिनांक २९ जानेवारी/२०२४ रोजी अटक केली. त्याने हे अमली पदार्थ मनोज पाटील उर्फ बाळा आपणास पुरवीत असल्याची कबुली दिली. तसेच त्याला गुजराथमध्ये अमली पदार्थांच्या प्रकरणात अटक झाली असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी मनोज पाटीलची माहिती घेतली असता तो अमली पदार्थ विक्री प्रकरणात गुजराथमधील लाजपोर तुरुंगात होता.मार्च २०२३ मध्ये तो पॅरोलवर आल्यानंतर परत कारागृहात हजर न होता पळून गेला असल्याची माहीती त्यांना मिळाली.
तो रहण्याचे ठिकाण वारंवार बदलत असल्याने आणि मोबाईल न वापरता व्हॉटसअप कॉलव्दारे संपर्क करीत असल्याने त्याला शोधणे मोठे जिकिरीचे बनले होते. परंतु पोलिसांनी मोठ्या शिताफ़ीने तपास करून त्याला दि. ०६ फ़ेब्रुवारी रोजी अटक केली. त्याच्याकडे तपास केल्यानंतर त्याचा साथीदार दिनेश देवजी म्हात्रे, वय ३८ वर्षे, रा. पेण, जि. रायगड याला १० फ़ेब्रुवारी रोजी पोलिसांनी अटक केली.
त्यांच्याकडे तपास केला असता या दोघांनी कलद गाव, ता. पेण, जि. रायगड येथील एक फार्महाऊस भाडयाने घेऊ न तेथे जून २०२३ ते नोव्हेंबर २०२३ या दरम्यान एमडी या अंमली पदार्थाची निर्मिती हेली. तो विकण्याचे काम मोहम्मद आमीर अमनतुल्लाह खान याने केले. फ़ार्महाऊसच्या मालकाला संशय आल्याने त्यांनी सर्व साहित्य तळोजा एमआयडीसी, वलप गाव, ता.पनवेल, जि.रायगड येथे गाळा भाडयाने घेऊन तेथे हलविले. आणि, तेथून त्यांचा अमलीपदार्थ निर्मितीचा व्यवसाय सुरू होता ही कबुली त्यांनी दिली.
ही कामगिरी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, अपर आयुक्त (गुन्हे), डॉ. पंजाबराव उगले, उप आयुक्त, गुन्हे शिवराज पाटील, सहाय्यक आयुक्त, (प्रतिबंध) गुन्हे इंद्रजीत कार्ले यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहरचे वरिष्ठ निरीक्षक संजय शिंदे यांनी दिलेल्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे सहाय्यक निरीक्षक निलेश मोरे, जगदीश गावीत, उप निरीक्षक दिपेश किणी, सहाअयक उपनिरीक्षक मोहन परब, राजेंद्र निकम, हवालदार विक्रांत पालांडे, हरीष तावडे, अभिजीत मोरे, शिवाजी वासरवाड, हुसेन तडवी, महेश साबळे, संदीप भांगरे, हेमंत महाले,नाईक अनुप राक्षे, महिला हवालदार शिल्पा कसबे, महिला शिपाई कोमल लादे यांनी केली.
Reviewed by ANN news network
on
२/१६/२०२४ ११:१०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: