विठ्ठल ममताबादे
उरण : ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील नामवंत व ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील कामगारांच्या वेगवेगळ्या समस्या सोडविण्यासाठी अग्रेसर असलेल्या भाजपा संयुक्त ट्रान्सपोर्ट संघटनेने आजपर्यंत अनेक गोररिबांना कामगारांना न्याय मिळवून दिला आहे.भारताचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी,भारताचे मंत्री नितीन गडकरी, गृहमंत्री अमित शहा,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,चंद्रकांत बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा संयुक्त ट्रान्सपोर्ट संघटनेची घौडदौड जोमाने यशस्वीपणे सुरूच आहे.अशा या संघटनेच्या रायगड जिल्हा उपाध्यक्ष पदी उरण तालुक्यातील करंजा रोड अंबेनगर येथील योगेश विजय म्हात्रे यांची निवड करण्यात आली आहे.
भाजपा संयुक्त ट्रान्सपोर्ट संघटनेची महत्वाची बैठक नवी मुंबई मधील नेरुळ येथे मोठया उत्साहात संपन्न झाली.यावेळी संयुक्त ट्रान्सपोर्ट संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष निर्गुण कवळे,महाराष्ट्र सरचिटणीस - हरप्रीत सिंग यांच्या हस्ते योगेश म्हात्रे यांना अधिकृतपणे नियुक्तीपत्र देण्यात आले.यावेळी विक्कीभाई पाटील कोषाध्यक्ष संयुक्त ट्रांसपोर्ट संघटना(महाराष्ट्र राज्य),महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य - कुमार भाई गोळे,महाराष्ट्र राज्य सचिव- दत्ता केंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते. योगेश म्हात्रे हे उच्चशिक्षित असून विविध समस्यांची त्यांना जाणीव आहे. त्यांचा जनसंपर्कही दांडगा आहे. त्यामूळे त्यांची निवड रायगड जिल्हा उपाध्यक्ष पदी करण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय अध्यक्ष निर्गुण कवळे यांनी दिली.याप्रसंगी योगेश म्हात्रे यांनी या निवडी बद्दल भाजपा संयुक्त ट्रान्सपोर्ट संघटनेचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते यांचे आभार मानले आहेत. माझ्यावर टाकलेला विश्वास मी सार्थ करेन. पक्षाचा, संघटनेचा विचार तळागाळात पोहोचवेन. कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देईन.असे मत योगेश म्हात्रे यांनी व्यक्त केले.एका योग्य उमेदवाराची निवड रायगड जिल्हाउपाध्यक्ष पदी झाल्याने नवनिर्वाचित रायगड जिल्हा उपाध्यक्ष योगेश विजय म्हात्रे यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.भाजपा पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते,मित्र परिवार, विविध सामाजिक संस्था, संघटनेचे पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष भेटून तर काही जणांनी व्हाट्सअप,फेसबुक आदी सोशल मिडियाच्या माध्यमातून योगेश म्हात्रे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
भाजपा संयुक्त ट्रान्सपोर्ट संघटनेच्या रायगड जिल्हाउपाध्यक्षपदी योगेश म्हात्रे
Reviewed by ANN news network
on
१/२९/२०२४ ११:२६:०० AM
Rating:
Reviewed by ANN news network
on
१/२९/२०२४ ११:२६:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: