बाबू डिसोजा कुमठेकर
निगडी : महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा आयोजित "मराठी भाषा संवर्धन पंधरवडा" दि १४ ते २८ जानेवारी २०२४ पर्यन्त साजरा करण्यात आला त्या अंतर्गत २८ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता समारोप कार्यक्रम शांता शेळके सभागृह निगडी येथे घेण्यात आला.
यावेळी कविसंमेलन आणि व्याख्यान आयोजित करण्यात आले. डॉ. प्रा. राजाभाऊ भैलुमे (लेखक, व्याख्याते ) व कवी संमेलन अध्यक्ष सोपान खुडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा कार्यकारिणी सदस्या किरण लाखे, किरण जोशी आणि कार्यवाह संजय जगताप हे उपस्थित होते.
सरस्वती प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
मातृभाषेचे दैनंदिन महत्व या विषयावर डॉ. प्रा. राजाभाऊ भैलुमे यांनी आपले विचार मांडून मातृभाषेतील दैनंदिन वापरात येणारे प्रसंग आपल्या मार्मिक शैलीत वर्णन केले.आपल्या स्वतःच्या अधिक सहभागाने आपण आपली माय मातृभाषा हिचे संवर्धन करू शकतो,त्यासाठी सर्वांचा सहभाग तितकाच मोलाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
कवी सोपान खुडे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन उत्साहात पार पडले. संमेलनात कविता, गझल, गवळण, लावणी, भक्तीगीत यांचे सादरीकरण अत्यंत आनंदाच्या व उत्साहाच्या वातावरणात सादरीकरण करण्यात आले व त्यास रसिकांनी उस्फूर्त दाद दिली.
या काव्य संमेलनात प्रसाद कालेकर, सुनिता बोडस , अंजली नवांगुळ , कांचन नेवे , शरद शेजवळ, हेमांगी बोडे, विलास वानखडे, प्राची देशपांडे ,माधुरी डिसोजा, सुनंदा शिंगनाथ, विनिता श्रीखंडे , शेख आय. के. , प्राची देशपांडे, अशोक कोठारी, शोभा जोशी, प्रभा वाघ , नागेश गव्हाड ,किरण जोशी, संजय जगताप, डॉ. संजीवनी महाजन यांनी आपल्या कविता रंगतदार शैलीत सादर केल्या.
कवी संमेलन अध्यक्ष ज्येष्ठ कवी सोपान खुडे यांनी अध्यक्षीय भाषणात कवितांच्या प्रकारांचे वर्णन व महत्त्व सांगून कविता अधिक प्रभावी कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले.
गायिका इला पवार , रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष वसंत गुजर आदी रसिक यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यवाह संजय जगताप यांनी केले. अतिथि परिचय प्राची कुलकर्णी यांनी दिला. तर किरण जोशी यांनी सर्वांचे आभार मानले
Reviewed by ANN news network
on
१/२९/२०२४ ०८:५६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: