विठ्ठल ममताबादे
उरण : केअर ऑफ़ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर आणि श्री समर्थ कृपा सखी स्वयं सहाय्यता संस्थेच्या अध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या संगिता ढेरे आणि डाबर इंडिया कंपनी यांच्या औदार्यातून आपटा सारसई येथील बागेचीवाडी आदिवासीवाडी आणि आपटा येथील आदिवासीवाडी या दोन आदिवासी वाड्यांवरील आदिवासी बांधवांनां रिअल फ्रेश फ्रुट ज्यूस,लोणचं, डाबर दंतकांती टूथपेस्ट , पिनट्स बटर वाटप करण्यात आले.
उपस्थित आदिवासीं समाजातील सामाजिक कार्यकर्ते संतोष सिंघाडे आणि दामू वाघ यांनी सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.वस्तूंरुपी सामान त्या चिमुकल्यानां आणि आदिवासी बांधवाना मिळाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्याजोगा होता.ह्या कार्यक्रमा करिता आदिवासीं महिला भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे राजू मुंबईकर,कॉन संस्थेचे अध्यक्ष स्नेहल पालकर, वेश्वी गावचे सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील, कॉन संस्थेचे वेश्वी शाखा उपाध्यक्ष सुरेन्द्र पाटील, अनिल घरत (उरण तालुका सचिव -- आगरी, कोळी, कराडी संघर्ष सामाजिक संस्था), बागेचीवाडी व आपटा आदिवासीवाडी वरील सर्व आदिवासी बांधवांच्या आणि बाळगोपालांच्यां उपस्थितीत हा सोहळा मोठ्या उत्साहात झाला.
सारसई येथील बागेचीवाडी आणि आपटा येथील आदिवासींना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप
Reviewed by ANN news network
on
१/३०/२०२४ ०७:५६:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
१/३०/२०२४ ०७:५६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: