पुणे : अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठादिन जवळ आला असतानाच पुणे येथे एक विस्मयकारी घटना घडली आहे.
काळाहौद परिसरात पटवर्धन यांच्या मालकीचे मारुती मंदिर आहे. हे मंदिर सुमारे चारशे वर्षांचे आहे. या मंदिरातील वीर मारुती स्वरुपातील असलेल्या मूर्तीवरील शेंदुराचे वर्षानुवर्षे लेपन झाल्यामुळे तयार झालेले आवरण याला खोळ असेही म्हणतात. ती काल दि. १६ जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा विधीला सुरुवात झाल्यावर आपोआप निघून आली.जणू श्रीरामाच्या आगमनानंतर स्वागतासाठी सज्ज होत मारुतीरायांनी शेंदुराचे लेपन बाजूस सारले आहे.
अशा प्रकारची घटना अनेक वर्षातून एकदा होत असते. अशीच एक शेंदुराची खोळ पुण्यातील प्रसिद्ध राजा दिनकर केळकर संग्रहालयातही ठेवण्यात आली आहे.
अयोध्येत श्रीराम प्राणप्रतिष्ठा विधी सुरू झाल्यावर पुण्यात घडली विस्मयकारी घटना
Reviewed by ANN news network
on
१/१७/२०२४ ०४:०९:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
१/१७/२०२४ ०४:०९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: