पुणे : 'शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले फाऊंडेशन' तर्फे आज हुतात्म्यांच्या परिवारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.सुशांत गोडबोले यांच्या स्मृतिदिनानिमित्त २९ जानेवारी २०२४ रोजी,सायंकाळी ५ वाजता हा सोहळा यशवंतराव चव्हाण सभागृह, कोथरुड येथे होणार आहे. वीरपत्नीच्या हस्ते दीपप्रज्वलन होणार आहे.कॅप्टन स्वाती महाडीक यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमात असणार आहे. 'सात रंग के सपने' हा मराठी -हिंदी गीतांचा विनामूल्य कार्यक्रम देखील या सोहळ्यात होणार आहे. हुतात्मा सुशांत गोडबोले यांना गाण्यांची आवड होती,त्यामुळे गाण्यांच्या कार्यक्रमाचा समावेश या सोहळ्यात करण्यात आला आहे. 'निषाद,पुणे ' निर्मित गाण्यांचा कार्यक्रम चंद्रशेखर महामुनी आणि कल्याणी देशपांडे-जोशी सादर करणार आहेत. निवेदन *पल्लवी देशमुख* करणार आहे. प्रास्ताविक गीता गोडबोले करणार आहे आणि आभार लायन सतीश राजहंस मानणार आहेत.'शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले फाऊंडेशन' च्या वतीने सुशांत यांच्या मातोश्री श्रीमती गीता गोडबोले यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली.
कॅप्टन सुशांत गोडबोले यांना २९ जानेवारी २००३ जम्मू येथे 'ऑपरेशन पराक्रम'दरम्यान जम्मू येथे वीरमरण आले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांची आई गीता गोडबोले यांनी शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले फाउंडेशनची स्थापना केली आहे. फाऊंडेशनतर्फे वर्षभर अनेक समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन केले जाते.
शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले फाऊंडेशनतर्फे आज हुतात्म्यांच्या परिवारांचा सन्मान सोहळा
Reviewed by ANN news network
on
१/२९/२०२४ १२:४८:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
१/२९/२०२४ १२:४८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: