ज्येष्ठ मराठी अभिनेता अशोक सराफ यांना २०२३ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिनंदन

मुंबई : ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेता अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. 

मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनही केले. 

अशोक सराफ यांनी  केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून  घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले असे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन करतांना म्हटले आहे.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही केले  अशोक सराफ यांचे अभिनंदन

“ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर झालेला ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार कलाक्षेत्रातील प्रदीर्घ देदिप्यमान कारकिर्दीचा, मराठीतील सुपरस्टार अभिनेत्याचा, महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वाचा गौरव आहे. आपल्या सहजसुंदर अभिनयानं, विनोदी भूमिकांनी त्यांनी रसिकांना मनमुराद हससवलं. मराठीसह हिन्दी कलाक्षेत्रं समृद्ध केलं. मराठीतील ‘सुपरस्टार’ अभिनेता म्हणून म्हणून नवोदित कलावंतांना प्रेरणा दिली. मार्गदर्शन केलं. वैयक्तिक जीवनातही आदर्श नैतिक मूल्यांची जपणूक केली. त्यांना जाहीर झालेला ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार एका महान कलावंताचा गौरव आहे. कोट्यवधी महाराष्ट्रवासियांनी एका अजातशत्रू व्यक्तिमत्वांवर केलेल्या प्रेमाचं हे प्रतिक आहे,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनेते अशोक सराफ यांचे अभिनंदन केले आहे.


ज्येष्ठ मराठी अभिनेता अशोक सराफ यांना २०२३ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर ज्येष्ठ मराठी अभिनेता अशोक सराफ यांना २०२३ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर Reviewed by ANN news network on १/३०/२०२४ ०७:४१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".