पालिकेच्या बेकायदेशीर,पक्षपाती कारवाईविरुद्ध धरणे आंदोलन

 


'पुणे शहर छोटे व्यावसायिक,गाळेधारक,भाडेकरू महासंघ'स्थापन 

मंत्री इस्टेट सोसायटीत टेरेसवरील  फ्लॅटसदृश  ८ बेकायदेशीर बांधकामांकडे  पालिकेचा काणाडोळा,
तळमजल्यांवरील गाळ्यांच्या शेडवर मात्र कारवाई 

पुणे : अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली पुणे शहरात चालू असलेल्या पालिकेच्या मनमानी ,पक्षपाती आणि बेकायदेशीर कारवाईच्या विरोधात दाद मागण्यासाठी 'पुणे शहर छोटे व्यावसायिक,गाळेधारक,भाडेकरू महासंघ'स्थापन करण्यात आला असून मनमानी कारवाईच्या विरोधात सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले.


पालिकेच्या मनमानी कारभाराविरोधात सर्व पातळ्यांवर दाद मागणार असल्याची माहिती यावेळी आली . महासंघाचे निमंत्रक हसीब कमलानी यांच्यासह ,डॉ.पायल शाह,हेमराम चौधरी,अशोक शिरवे, तेजस शाह यांच्यासह अनेक गाळे धारक, भाडेकरू, नागरीक प्रतिनिधी सहभागी झाले

पुणे पालिकेच्या या संशयास्पद कारवाईची चौकशी व्हावी. मंत्री इस्टेस्ट सोसायटीसह सर्व अन्यायग्रस्त गाळे धारकांना न्याय मिळावा. बड्या धेंडांच्या बेकायदेशीर बांधकामांवर प्राधान्याने कारवाई करावी,या मागण्या करण्यात आल्या.

महासंघाच्या भूमिकेची पुष्टी करण्यासाठी सॅलिस्बरी पार्क येथील सोसायटीमधील हेतूपूरस्सर झालेल्या , दूजाभाव करणाऱ्या अतिक्रमण तोडणाऱ्या कारवाईची माहिती देखील  दिली गेली .सॅलिसबरी पार्क मधील मंत्री इस्टेट को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी मध्ये निवासी फ्लॅट आणि ४० व्यावसायिक गाळे आहेत.त्यात दुकाने,कॅफे,किराणा,सलून,दवाखाना असे व्यवसाय चालवले जातात. त्यांच्याकड़े सर्व आवश्यक परवाने आहेत. याच इमारतीच्या टेरेस वर काही रहिवाशांनी बेकायदेशीर बांधकाम करून शेड टाकून ८ फ्लॅट तयार करून वापर चालविला आहे.बाल्कनी बंद करून खोल्या करण्यात आल्या आहेत.त्याविरोधात गाळेधारकांनी पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाकडे,बांधकाम विभागाकडे  लेखी तक्रारी केल्या.टेरेसवरील बेकायदेशीर फ्लॅट सदृश अवैध बांधकामाचेवर कारवाई होण्याऐवजी तक्रार करणाऱ्या गाळेधारकावर अतिक्रमण विभागाने नोटीस न देता,वेळ न देता  कारवाई केली.

टेरेस वरील फ्लॅट बांधकामाचे साहित्य खालच्या गाळ्यात येणाऱ्या ग्राहकांवर पडून जीवितहानी होऊ नये ,कचरा पडू नये म्हणून गाळे धारकांनी तात्पुरत्या शेड बांधल्या होत्या. त्या फुटपाथवर किंवा रस्त्यावर नसून गाळ्यासमोर इमारतीच्या जागेतच आहेत. मात्र,त्या पाडताना तेथील फ्रिज,मशिनरी,सामान देखील तोडण्यात आले. आणि शिवीगाळ करून लाखोंचे नुकसान करण्यात आले.त्यामागे या इमारतीत राहणारा  जामसिंग गिरासे हा  पुणे जिल्हा परिषदेतील महिला व बालविकास  अधिकारी असून त्याने गाळे धारकांकडे अतिक्रमण विरोधी कारवाई नको असल्यास दरमहा १ लाख रुपये मला द्या,अशी मागणी करून धमक्याही देत असल्याची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली.  

टेरेसवरील बेकायदा फ्लॅट बांधकाम वाचविण्यासाठी पालिकेतील अधिकाऱ्यांच्या साहाय्याने गाळेधारकांच्या शेडचे बळी देऊन कागद रंगविण्यात आल्याचा आरोप महासंघाने केला.   

अतिक्रमण विरोधी कारवाईच्या चौकशीची मागणी

पुणे शहरात सुरु असलेली अतिक्रमण विरोधी कारवाई शंकास्पद असून या मोहिमेचीच चौकशी करावी,अशी मागणी या पत्रकार परिषदेत करण्यात आली. जिथे ही कारवाई केली गेली आहे ,तिथे छोट्या व्यवसायिकांचा बळी देण्यात आला असून बड्यांची अतिक्रमणे त्यामागे हुशारीने लपवली आहेत,असा आरोप या पत्रकार परिषदेत करण्यात आला. अतिक्रमण विरोधी कारवाई ही दुबळ्यांवर होत नाही. जे लोक प्रभावीपणे दाद मागू शकणार नाहीत,अशाच ठिकाणी कारवाई होत आहे. शहरात असलेली रुफटॉप हॉटेले पालिकेच्या आणि उच्च पदस्थांशी संबंधित आहेत.तिथे मात्र कोणीही कारवाईला जात नाही,असा दाखला या पत्रकार परिषदेत देण्यात आला. 


पालिकेच्या बेकायदेशीर,पक्षपाती कारवाईविरुद्ध धरणे आंदोलन पालिकेच्या बेकायदेशीर,पक्षपाती कारवाईविरुद्ध धरणे आंदोलन Reviewed by ANN news network on १/१७/२०२४ ०१:१६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".