रत्नागिरी जिल्ह्यात ११ व्यक्तींना मराठा कुणबी व कुणबी व्यक्तींना ४ लाख ७ हजार ४५२ जात प्रमाणपत्रे वितरित

 


रत्नागिरी  : रत्नागिरी जिल्हयामध्ये मागील ३ महिन्यापासुन अभिलेखे तपासणीचे काम सुरु आहे. जिल्हयामध्ये ५३ लाख ६६ हजार ७५० इतक्या नोंदी तपासलेल्या असुन त्यापैकी १३० नोंदी कुणबी मराठा व मराठा कुणबी तसेच ४ लाख ६१ हजार ७३० कुणबी नोंदी आढळून आलेल्या आहेत. या नोंदीवरुन आज अखेर जिल्हयात मराठा कुणबी / कुणबी मराठा व्यक्तीना ११ व कुणबी व्यक्तीना ४ लाख ०७ हजार ४५२ जात प्रमाणपत्रे देण्यात आलेली आहेत.

 तपासणीमध्ये आढळून आलेल्या कुणबी, कुणबी मराठा व मराठा कुणबी नोंदी गावचावडीवर प्रसिध्द करुन तहसील स्तरावर शिबीरे आयोजित करुन जातीचे दाखले वितरीत करण्यात येणार आहेत.

३१ ऑक्टोबर २०२३ च्या शासन निर्णयानुसार माजी न्यायमूर्ती संदिप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीच्या स्वीकृत केलेल्या पहिल्या अहवालाच्या अनुषंगाने अभिलेख तपासणी दिनांक १० डिसेंबर २०२३ पर्यंत करण्यात आली. त्यानंतर दि. ११ डिसेंबर २०२३ रोजी समितीने सदर कामकाजाबाबत आढावा बैठक घेतली. समितीच्या सुचनेनुसार अभिलेख तपासणीचे कामकाज पुढे सुरु ठेवण्यात आले. त्यानंतर आतापर्यंत आढळून आलेल्यादीचा अहवालसमितीस सादर करण्यात आला.

अभिलेख तपासणीची तालुकानिहाय, तसेच कार्यालयात सापडलेल्या नोंदीची माहिती पुढीलप्रमाणे आहे. मंडणगड – मराठा कुणबी/कुणबी मराठा – 4, कुणबी नोंदी – 5091, दापोली -12 मराठा कुणबी/कुणबी मराठा, कुणबी नोंदी – 40576, खेड – 6 मराठा कुणबी/कुणबी मराठा, कुणबी नोंदी -27451, चिपळूण – 45 मराठा कुणबी/कुणबी मराठा,  कुणबी नोंदी- 56026, गुहागर – 1 मराठा कुणबी/कुणबी मराठा, कुणबी नोंदी- 46193, संगमेश्वर – 0 मराठा कुणबी/कुणबी मराठा, कुणबी नोंदी – 22627, रत्नागिरी – 1 मराठा कुणबी/कुणबी मराठा, कुणबी नोंदी – 80802, राजापूर – 55 मराठा कुणबी/कुणबी मराठा, कुणबी नोंदी- 102143, लांजा – 0 मराठा कुणबी/कुणबी मराठा, कुणबी नोंदी- 18828 तसेच जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय – 1 मराठा कुणबी/कुणबी मराठा, कुणबी नोंदी-754, शिक्षण विभाग, जि.प. – 0 मराठा कुणबी/कुणबी मराठा, कुणबी नोंदी- 51135, जिल्हा सहनिंबधक – 0 मराठा कुणबी/कुणबी मराठा, कुणबी नोंदी- 3073, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी – 0 मराठा कुणबी/कुणबी मराठा, कुणबी नोंदी- 8, 1967 पुर्वीचे सेवा – 4 मराठा कुणबी/कुणबी मराठा, कुणबी नोंदी – 7023.

            24 ऑक्टोबर 2023 पासून कुणबी जात प्रमाणपत्रासाठी प्राप्त अर्जांची संख्या 8344 तर कुणबी मराठा/मराठा कुणबी साठी प्राप्त अर्जांची संख्या 11 आहे. यापैकी 24 जानेवारी 2024 अखेर 8295 कुणबी जात प्रमाणपत्र तर कुणबी मराठा/मराठा कुणबी 11 जात प्रमाणपत्र दाखले निर्गमित करण्यात आले आहेत. कुणबी साठीचे 49 जात प्रमाणपत्रासाठीचे अर्ज प्रलंबित असून ते मुदतीतील आहेत.


रत्नागिरी जिल्ह्यात ११ व्यक्तींना मराठा कुणबी व कुणबी व्यक्तींना ४ लाख ७ हजार ४५२ जात प्रमाणपत्रे वितरित रत्नागिरी जिल्ह्यात  ११ व्यक्तींना मराठा कुणबी व कुणबी व्यक्तींना ४ लाख ७ हजार ४५२ जात प्रमाणपत्रे वितरित Reviewed by ANN news network on १/२५/२०२४ ०१:४७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".