देवाच्या आळंदीत वारकरी प्रशिक्षण संस्थाचालक बनला दानव!; १५ दिवस करत होता अल्पवयीन विद्यार्थ्यांवर अत्याचार!!
पिंपरी : तीर्थक्षेत्र आळंदी येथे एका वारकरी प्रशिक्षण संस्थाचालकाने तेथे शिकणार्या तीन अल्पवयीन मुलांवर अत्याचार केला. या प्रकरणी त्याला आळंदी पोलिसांनी अटक केली आहे.
दासोपंत उर्फ स्वामी हरिभाऊ उंडाळकर, वय ५२ असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपी एक वारकरी प्रशिक्षण संस्था चालवतो. तेथे ७० मुले शिकत आहेत. त्यापैकी तिघांना त्याने एकांतात बोलावून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार १५ दिवसांपासून सुरू होता. पीडित मुलांनी हा प्रकार त्यांच्या पालकांना सांगितल्यानंतर उघडकीस आला. त्यांनी या प्रकरणी आळंदी पोलीसठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून आरोपीच्या विरोधात भादंवि 377 व बाल लैंगिक अत्याचार कायदा कलम ४, ५ (फ), ६, ८, १० अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
देवाच्या आळंदीत वारकरी प्रशिक्षण संस्थाचालक बनला दानव!; १५ दिवस करत होता अल्पवयीन विद्यार्थ्यांवर अत्याचार!!
Reviewed by ANN news network
on
१/२७/२०२४ ०२:१३:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
१/२७/२०२४ ०२:१३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: