पुणे : पुण्यातील चौघांनी सायकलवरून पुणे ते गिरनारजी- सोमनाथ पर्यंतचा ११०० किलोमीटरचा प्रवास अवघ्या ९ दिवसात पूर्ण केला.
उत्तम धोका आणि आकाश राठोड, सुरेश पिताणी, विर उत्तम धोका अशी त्यांची नावे आहेत. उत्तम धोका ४७ वर्षांचे आहेत. त्यांनी प्रवासद्वारे धर्म आणि आरोग्य यांची सांगड घालत ते कसे जपावे याचा आदर्श याद्वारे तरुणांसमोर ठेवला आहे.
पुणे सातारा रस्त्यावरील आदिनाथ सोसायटीपासून या सर्वांनी आपल्या सायकल प्रवासाची सुरुवात केली.या ९ दिवसात त्यांनी गुजरात मधील सोमनाथ आणि गिरनारजी पर्यंत यशस्वीरित्या प्रवास केला. वातावरणातील बदलांची पर्वा न करता त्यांनी दररोज १२० ते १३० किलोमीटर अंतर पार केले.
या चमूने आजवर पुणे ते पालिताणा, शिर्डी, तुळजापूर, पंढरपूर,गेटवे ऑफ इंडिया, अंतरिक्ष पार्श्वनाथ जैनतिर्थ, सम्मेत शीखरजी आदी प्रवास यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत.
भविष्यात पुणे ते केदारनाथ आणि राजस्थानमधील सर्व जैन तिर्थक्षेत्रांचे दर्शन सायकलव्दारे करण्याची त्यांची मनीषा आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: