पिंपरी - लोणावळा ते पुणे दरम्यान धावणाऱ्या लोकलचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते उद्या (बुधवारी) उद्घाटन होणार आहे. लोणावळा रेल्वे स्थानक येथे दुपारी अडीच वाजता उद्घाटन होणार आहे. दानवे ऑनलाइन हिरवा झेंडा दाखविणार आहेत. मावळचे खासदार श्रीरंग बारणे हे देखील ऑनलाइन उपस्थित असणार आहेत. याबाबतची माहिती मंडल रेल प्रबंधक इंदू दुबे यांनी दिली.
कोरोना साथ सुरु होण्यापूर्वी पुणे-लोणावळा दरम्यान लोकल गाड्यांचे संचालन व्यवस्थित सुरु होते. कोरोना साथीच्या कालावधीत रेल्वेची सेवाच बंद करण्यात आली. कोरोनानंतर आता देशात पूर्वीप्रमाणे सर्व रेल्वे सुरु झाल्या आहेत. कोरोना साथीच्या अगोदर पुणे-लोणावळा दरम्यान सकाळी साडे अकरा ते दुपारी अडीच वाजताच्या कालावधीत दोन लोकल गाड्या चालवल्या जात होत्या. त्या गाड्यांचे संचालन बंद होते.साडे दहा ते अडीच या वेळेत लोकल सेवा बंद होती. दुपारच्या वेळेत रेल्वे सुरू करण्याची मागणी खासदार बारणे यांनी संसदेत, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे सातत्याने केली होती. अखेरिस खासदार बारणे यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, लोणावळा ते पुणे दरम्यान लोकल उद्यापासून सुरू होणार आहे. यामुळे प्रवासी, विद्यार्थी, चाकरमानी, नोकरदार, पर्यटक यांची मोठी सोय होणार आहे.
रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते उद्या पुणे-लोणावळा लोकलचे उद्घाटन
Reviewed by ANN news network
on
१/३०/२०२४ ०८:४६:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
१/३०/२०२४ ०८:४६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: