पिंपरी : पिंपरीतील भाजपचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे हे आपल्या मातु:श्री कै. सुमनताई बाळकृष्ण वाघेरे यांच्या स्मरणार्थ दि. ३ फेब्रुवारी पासून प्रत्येक शनिवारी शहरातील नागरिकांसाठी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्याचा स्तुत्य उपक्रम चालू करत आहेत.
तपोवन मंदिर रोड पिंपरीगाव येथील वाघेरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात हे शिबीर होणार आहे. यामध्ये अनियमित रक्तदाब,मधुमेह,हृदयरोग,बालरोग, त्वचाविकार, किडनीविकार,मेंदूचे आजार,कॅन्सर,व्हेरिकोज व्हेन्स व नेत्ररोग, काचबिंदू, मोतीबिंदू, डोळ्यांच्या मागचा पडदा, तिरळेपणा, आदी आजारांची मोफत तपासणी व उपचार केले जाणार आहेत.
यासाठी लोकमान्य हॉस्पिटल चिंचवड व डॉ चाकणे आय हॉस्पिटल पिंपळे सौदागर यांचे सहकार्य लाभले आहे. शिबिराचे नियोजन संदीप वाघेरे युवा मंचाच्या करण्यात येणार आहे. या शिबिराचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी 9673494149/9145494149 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संदीप वाघेरे यांनी केले आहे.
सध्या वैद्यकीय उपचार खर्चाच्यादृष्टीने सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. अशा वेळी वाघेरे यांनी आयोजित केलेली शिबिरे हा आशेचा किरण आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: