बिगरॉक मोटरस्पोर्टसह सीएस संतोष यांनी केले सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगचे नेतृत्व

 



 

बीबी रेसिंग, फ्रान्सचे जोर्डी टिक्सियर यांनी होंडावर सवार होत ४५० सीसी आंतरराष्ट्रीय रेसमध्ये मिळवले पहिले स्थान

 

~ बिगरॉक मोटरस्पोर्ट, ऑस्ट्रेलियन रेसर रीड टेलर यांनी कावासकीवरून केले २५० सीसी आंतरराष्ट्रीय रेसचे नेतृत्व


~ बिगरॉक मोटरस्पोर्ट, थायलंडचे थनारत पेंजन यांनी कावासकीवरून जिंकली २५० सीसी इंडिया एशिया मिक्स

 

पुणे : सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगच्या (आयएसआरएल) पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या शुभारंभाच्या रेसला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात बिगरॉक मोटरस्पोर्ट लीड टीम म्हणून प्रथम क्रमाकांवर उभा राहिला. फ्रान्सच्या बीबी रेसिंगच्या जॉर्डी टिक्सियर यांनी होंडावर स्वार होत ४५० सीसी आंतरराष्ट्रीय रेसमध्ये पहिले स्थान मिळवत पुण्याच्या जनतेचे स्वागत केले. बिगरॉक मोटरस्पोर्टचे ऑस्ट्रेलियन रेसर रीड टेलर यांनी कावासकीवरून २५० सीसी आंतरराष्ट्रीय रेसमध्ये टीमचे नेतृत्व केले, तर बिगरॉक मोटरस्पोर्ट, थायलंडचे थनारत पेंजन यांनी कावासकीवरून २५० सीसी इंडिया एशिया मिक्स जिंकत टीमला आणखी पुढे नेले.

 

बिगरॉक मोटरस्पोर्ट्सने सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग (आयएसआरएल) या पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या आणि फ्रँचाईझी प्रकारच्या सुपरक्रॉस स्पर्धेमध्ये सर्व विभागांत पोडियम मिळवत पुण्यातील चाहत्यांना सुखद धक्का दिला.

 

पुण्यात झालेल्या सीझनच्या पहिल्या रेसमध्ये प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय चॅम्पियन्सबरोबरच उद्योन्मुख भारतीय स्टार्स चार विभागांत समाविष्ट झाले होते – ४५० सीसी आंतरराष्ट्रीय रायडर्स, २५० सीसी आंतरराष्ट्रीय रायडर्स, २५० सीसी इंडिया एशिया मिक्स आणि प्रचंड स्पर्धात्मक ८५ सीसी ज्युनियर क्लास. जगभरातील आघाडीच्या रायडर्सना एकत्र आणणाऱ्या या रेसमुळे जागतिक दर्जाचा सुपरक्रॉस प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला आहे. ही लीग सर्व वयोगट आणि कौशल्याच्या रायडर्सना स्पर्धात्मक तसेच सुरक्षित वातावरण पुरवण्यासाठी सज्ज आहे.

 

सीएट सुपरक्रॉस रेसिंग लीगचे सह- संस्थापक आणि संचालक श्री. वीर पटेल पहिल्या सीझनच्या पहिल्या रेसबद्दल म्हणाले, पुण्यातील चाहत्यांकडून मिळालेला प्रतिसाद भारावणारा होता. त्यांच्या उत्साहाला तर सीमाच नव्हती. सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग भारताला जागतिक सुपरक्रॉसच्या केंद्रबिंदूचे स्थान मिळवून देईल. रायडर्सनी त्यांचे असामान्य कौशल्य आणि खेळाप्रती बांधिलकीचे दर्शन यावेळी घडवले. दमदार सहभाग आणि रेस जिंकण्याची निश्चयी वृत्ती यांचे आम्हाला कौतुक वाटते. विजेते आणि त्यांच्या टीमचे सहभागी झाल्याबद्दल आम्ही अभिनंदन करतो. सीएट आयएसआरएल अहमदाबादमधील चाहत्यांनाही असाच अविस्मरणीय अनुभव देण्यासाठी उत्सुक आहे.

 

पुण्यात दमदार सुरुवात करणाऱ्या या कार्यक्रमासाठी तब्बल १०,००० चाहते श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, बालेवाडी येथे जमले होते. यानंतर ११ फेब्रुवारी रोजी अहमदाबाद येथील इका एरिना, ट्रान्सस्टॅडिया येथे असाच थरार अनुभवायला मिळणार आहे. या लीगची अंतिम फेरी नवी दिल्ली येथे होणार आहे. सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगच्या या थरारक सीझनची सांगता २४ फेब्रुवारी २०२४ रोजी जवाहरलाल नेहरू स्टेडियम, दिल्ली येथील अंतिम रेससह होणार आहे.

 

सीएट आयएसआरएल सीझन वन रायडर ऑक्शनविषयी अधिक माहिती आणि टीम निवडीविषयी अद्ययावत माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या

बिगरॉक मोटरस्पोर्टसह सीएस संतोष यांनी केले सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगचे नेतृत्व  बिगरॉक मोटरस्पोर्टसह सीएस संतोष यांनी केले सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगचे नेतृत्व Reviewed by ANN news network on १/२९/२०२४ ०३:५४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".