महाराष्ट्रात १ कोटी विकसित भारत अँबेसेडर बनवण्याचे लक्ष्य

 



नमो ॲप अभियान राष्ट्रीय संयोजक कुलजीत सिंग चहल यांची माहिती

 

मुंबई : राज्यभरात प्रदेश भाजपा तर्फे एक कोटी पेक्षा अधिक विकसित भारत अँबेसेडर बनविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आल्याची माहिती भाजपाच्या नमो ॲप अभियानाचे राष्ट्रीय संयोजक कुलजीत सिंग चहल यांनी शनिवारी दिली. भाजपा प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत श्री.चहल यांनी विकसित भारत अँबेसेडर अभियानाची माहिती दिली. यावेळी भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख व विकसित भारत ब्रँड अँबेसेडर अभियान प्रदेश संयोजक नवनाथ बन उपस्थित होते.

श्री. चहल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील विकसित भारत संकल्पासोबत हे विकसित भारत ब्रँड अँबेसेडर जोडले जातील. मोदी सरकारच्या महत्वाकांक्षी कल्याणकारी योजनांचा लाभ समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य हे अँबेसेडर करणार आहेत. भाजपा चा प्रत्येक कार्यकर्ता असे कमित कमी १० अँबेसेडर बनवेल असेही श्री.चहल यांनी नमूद केले. ज्या लाभार्थ्यांना मोदी सरकारच्या योजनांचा लाभ झाला त्या सर्वानी या मोहिमेत सहभाग घ्यावा असे आवाहन ही श्री.चहल यांनी केले. प्रदेश भाजपा ने १ कोटी विकसित भारत अँबेसेडर बनवण्याचे लक्ष्य साध्य करण्याचा निर्धार व्यक्त केल्याबद्दल श्री.चहल यांनी समाधान व्यक्त केले.

महाराष्ट्रात १ कोटी विकसित भारत अँबेसेडर बनवण्याचे लक्ष्य महाराष्ट्रात १ कोटी विकसित भारत अँबेसेडर बनवण्याचे लक्ष्य Reviewed by ANN news network on १२/३०/२०२३ ०९:०१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".