नगर : कोरोनाच्या जे एन १ व्हेरीएंटचे रुग्ण देशात वाढू लागले आहेत. त्यातच नाताळ आणि वर्षाखेर असल्याने पर्यटनस्थळांसह धार्मिकस्थळी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. यातून कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता असल्याने शिर्डी येथे मास्क नसलेल्या भाविकांना श्री साईबाबांच्या मंदिरात दर्शनासाठी प्रवेश दिला जाऊ नये अशा सूचना नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी साईसंस्थानच्या प्रशासनाला दिल्या आहेत.
प्रशासनाने यावर तातडीने कार्यवाही केली असून मंदिरामध्ये दर्शनासाठी येणार्या भाविकांना मास्क नसल्यास मंदिराच्या प्रवेशद्वारानजिक मास्क उपलब्ध करून दिले जाणार आहेत. अशी माहिती साईसंस्थानचे कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी दिली आहे.
साईबाबांच्या दर्शनासाठी मास्क बंधनकारक
Reviewed by ANN news network
on
१२/२७/२०२३ ०२:४४:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
१२/२७/२०२३ ०२:४४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: