लायन्स क्लब पनवेल आणि जन कल्याण सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन
विठ्ठल ममताबादे
उरण : ग्रामपंचायत वेश्वी,तालुका उरण येथे जन कल्याण सामाजिक संस्था व लायन्स क्लब पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिराचे उद्घाटन प्रा. राजेंद्र मढवी उपाध्यक्ष उरण सामाजिक संस्था व सुनील तांबोळी सरपंच वेश्वि ग्राम पंचायत यांच्या हस्ते करण्यात आले. सुधाकर पाटील अध्यक्ष उरण सामाजिक संस्था व संतोष पवार सरचिटणीस उरण सामाजिक संस्था हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. लायन्स क्लब पनवेल यांच्या वतीने श्री.चव्हाण, श्री.गिल्डा, ॲड मनोज म्हात्रे आणि नायर नेत्र रुग्णालयाची टीम यांनी खूप मेहनत घेतली.
या नेत्रचिकित्सा शिबिरात सर्वात जास्त म्हणजे जवळ जवळ ३०० लोकांच्या डोळ्यांची तपासणी झाली. त्यात रेकॉर्डब्रेक ६४ लोकांची मोतीबिंदू शस्त्र क्रियेसाठी पात्र ठरले. आज पर्यंत झालेल्या कॅम्पमध्ये आजचा कॅम्प हा सर्वच रेकॉर्ड ब्रेक करणारा ठरला.
सरपंच सुनील तांबोळी यांनी त्यांच्यातर्फे सर्वांना मोफत चष्मा देण्याचे घोषित केले. जनकल्याण सामाजिक संस्थेच्या सर्व पदाधिकारी राजेंद्र पाटील, मदन पाटील, अच्युत कडू, संदीप मुंबईकर, विजय पाटील, शरद पालकर यांचे योगदान विशेष महत्त्वाचे ठरले.
सर्वांनी मनापासून मेहनत घेतली म्हणून हे आयोजन यशस्वी झाले. संध्याकाळ झाल्यामुळे कॅम्प थांबवण्यात आला आणि दोन दिवसांनी आदिवासीवाडीसाठी पुन्हा कॅम्पचे आयोजन करण्याचे ठरले आहे.
Reviewed by ANN news network
on
१२/२७/२०२३ ०१:४५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: