शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने पिंपरीतील फुले महाविद्यालयात वृक्ष लागवड

 


पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व ज्येष्ठ खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवडमधील विविध महाविद्यालयांमध्ये वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने पिंपरी येथील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात वृक्षांची लागवड करण्यात आली. 

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष राहुल आहेर व त्यांच्या टीमने शरद पवार यांच्या वाढदिवसापासून शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये वृक्ष लागवडीचा संकल्प करत त्याची अंमलबजावणी करत आहेत. त्यानुसार सांगवी येथील बा. रा. घोलप महाविद्यालयात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी चैतन्य बनकर व संकेत वाघमारे यांच्या पुढाकाराने वृक्ष लागवड करण्यात आली होती.

आता महाविद्यालय अध्यक्ष अभिषेक कांबळे यांच्या पुढाकारातून पिंपरी येथील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शहराध्यक्ष राहुल आहेर, प्राचार्य डॉ. माधव सरोदे, मुख्य प्रवक्ते राहुल नेवाळे, शहर सचिव रिषभ भडाळे, भोसरी अध्यक्ष नितीन मोरे, महाविद्यालय अध्यक्ष अभिषेक कांबळे, पिंपरी विभाग अध्यक्ष ऋतिक गायकवाड, चिंचवड विधानसभा प्रमुख जगदीश गपाट, उपप्राचार्य कला विभाग डॉ. मृणालिनी शेखर, उपप्राचार्य विज्ञान विभाग प्रा. शहाजी मोरे, उपप्राचार्य कॉमर्स विभाग प्रा. अनिकेत खत्री तसेच प्राध्यापक सहकारी आणि विद्यार्थी आदी उपस्थित होते.

शहराध्यक्ष राहुल आहेर यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आवाहन केले. शरद पवार यांनी पिंपरी चिंचवड शहराच्या विकासासाठी केलेल्या विविध विकास कामांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या उपक्रमाचे कौतुक केले. शरद पवार यांच्या वाढदिवसही साजरा करण्यात आला.
शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने पिंपरीतील फुले महाविद्यालयात वृक्ष लागवड शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने पिंपरीतील फुले महाविद्यालयात वृक्ष लागवड Reviewed by ANN news network on १२/२७/२०२३ ०५:०४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".