भाजपा शहर उपाध्यक्षपदी जवाहर ढोरे, सरचिटणीसपदी गणेश ढोरे यांची निवड

 

पिंपरी : भारतीय जनता पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) उपाध्यक्षपदी जवाहर मनोहर ढोरे तर सरचिटणीसपदी गणेश ढोरे यांची निवड करण्यात आली आहे. भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देवून ही निवड जाहीर करण्यात आली. जवाहर ढोरे हे माजी महापौर माई ऊर्फ उषा ढोरे यांचे चिरंजीव आहे.

जवाहर ढोरे आणि गणेश ढोरे यांचे आजपर्यंतचे सेवाभावी कार्य पाहता त्यांना राष्ट्रीय पक्षाचे पदाधिकारी म्हणून काम करण्याची संधी देण्यात येत आहे. पक्षाचे काम चांगल्या प्रकारे करून जनसेवा व भारतीय जनता पार्टीचा प्रचार, प्रसार करून कामगीरी उंचावणार असल्याचा विश्वास शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी व्यक्त केला आहे. जवाहर ढोरे, गणेश ढोरे यांनी सांगवी परिसरात सामाजिक, धार्मिक, आरोग्य सेवा कार्यातून आपली छाप पाडली असून अनेक सामाजिक कार्यात त्यांचा पुढाकार असतो.

भाजपा शहर उपाध्यक्षपदी जवाहर ढोरे, सरचिटणीसपदी गणेश ढोरे यांची निवड भाजपा शहर उपाध्यक्षपदी जवाहर ढोरे, सरचिटणीसपदी गणेश ढोरे यांची निवड Reviewed by ANN news network on १२/३०/२०२३ ०८:५२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".