बाबा जोरावरसिंग, बाबा फतेहसिंग यांच्या शौर्याला अभिवादन

 


नवी दिल्ली  :  देशात 26 डिसेंबर हा दिवस  वीर बाल दिवस म्हणून पाळला जातो. हा दिवस गुरु गोबिंद सिंगांचे सुपूत्र साहिबजादा बाबा जोरावरसिंग आणि साहिबजादा बाबा फतेहसिंग यांच्या पराक्रम आणि बलिदानाची आठवण म्हणून पाळला जातो. यानिमित्त महाराष्ट्र सदनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कॉपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रधान सचिव व निवासी आयुक्त  रुपिंदर सिंग यांनी बाबा जोरावरसिंग व बाबा फतेहसिंग यांच्या  प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. त्यानीही यावेळी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

महाराष्ट्र परिचय केंद्रात अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात बाबा जोरावरसिंग व बाबा फतेहसिंग यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या उपसंचालक(माहिती) अमरज्योतकौर अरोरा यांनी  बाबा जोरावरसिंग व बाबा फतेहसिंग यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी  उपस्थित  कर्मचा-यांनी  प्रतिमेस  पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

बाबा जोरावरसिंग, बाबा फतेहसिंग यांच्या शौर्याला अभिवादन बाबा जोरावरसिंग, बाबा फतेहसिंग यांच्या शौर्याला अभिवादन Reviewed by ANN news network on १२/२६/२०२३ ०८:५१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".