दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सांगवीमध्ये ५ ते ७ जानेवारी रोजी विनामूल्य अटल महाआरोग्य शिबीर

 


पिंपरी : चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त दि. ५ ते ७ जानेवारी या कालावधीत सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर अटल विनामूल्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 

महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग, पिंपरी चिंचवड महापालिका, प्रतिभा महिला प्रतिष्ठान, चंद्ररंग चॅरीटेबल ट्रस्ट आणि अटल चॅरीटेबल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. 

या शिबिरात ससून हॉस्पिटल, जिल्हा रुग्णालय,  औंध, वाय. सी.एम. रुग्णालय. टाटा मेमोरीअल हॉस्पिटल (मुंबई), कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल, आदित्य बिर्ला हॉस्पिटल, जहांगीर हॉस्पिटल, दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल,  संचेती हॉस्पिटल,  पूना हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल, इन्लॅक्स बुधराणी इन्स्टिट्यूट,  एच. व्ही. देसाई हॉस्पिटल, व्हिजन नेक्स्ट फाऊंडेशन,  डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, लोकमान्य हॉस्पिटल (चिंचवड),  एमआयएमईआर मेडिकल कॉलेज आणि बीएसटीआर हॉस्पिटल, सिंबायोसिस युनिव्हर्सिटी हॉस्पिटल एमआयएमइआर मेडिकल कॉलेज आणि डॉ. बीएसटीऊ. श्रीमती काशीबाई नवले हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज,  इंद्रायणी कॅन्सर हॉस्पिटल, रुबी एल केअर सर्व्हिस लिमिटेड,  देवयानी हॉस्पिटल (कोथरूड,) ओम हॉस्पिटल (भोसरी), श्री हॉस्पिटल क्रिटीकेअर आणि तृमा सेंटर कोहाकडे हॉस्पिटल सनराईज हॉस्पिटल आयुर्वेदिक न्युरो थेरपी,  नारायण धाम,  नॅशनल आयुष मिशन (एन.ए.एम),  स्टर्लिंग हॉस्पिटल,  ज्युपिटर हॉस्पिटल,  सूर्या मदर अँड चाईल्ड सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल ही हॉस्पिटल्स  रुग्णतपासणीसाठी सहभागी होणार आहेत.

या शिबिरात हृदयरोग शस्त्रक्रिया व प्रत्यारोपण किडनी विकार व प्रत्यारोपण कॉक्लिअर इन्प्लान्ट, लिव्हर प्रत्यारोपण, गुडघे प्रत्यारोपण, हाडांचे व मणक्यांचे आजार, हिप प्रत्यारोपण, कॅन्सर शस्त्रक्रिया व केमोथेरपी, प्लास्टिक सर्जरी, दंतरोग, नेत्ररोग, बालरोग तपासणी व शस्त्रक्रिया, मोफत श्रवणयंत्रे, मेंदुची शस्त्रक्रिया, आयुर्वेदिक उपचार मूत्र मार्गाचे विकार,  त्वचाविकार, फाटलेली टाळू व ओठावरील शस्त्रक्रिया, बॉडी चेकअप ,फिट येणे कान-नाक-घसा,  अनियमित रक्तदाब आणि शुगर तपासणी, किशोरवयीन मुलींचे समुपदेशन, गरोदर माता तपासणी, स्त्री रोग, हिमोग्लोबिन तपासणी, तसेच सर्व आजारांवर आयुष्यमान भारत व महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया, लहान बालकांच्या हृदयामधील छिद्राची शस्त्रक्रिया, मोफत अ‍ॅन्जिओग्राफी,  अपंगांना जयपूर फूट व कैलीपर, युनानी, सिध्दा, होमिओपॅथी, कायरोप्रॅक्टिक थेरपी आदी तपासण्या व उपचार होणार आहेत.शिबिरासाठी नावनोंदणी ऑनलाईनही करता येणार आहे.

शिबिराचा लाभ घेण्यासाठी गरजूंनी ओळख व पत्त्याचा पुरावा (आधार कार्ड, मतदारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा रेशन कार्ड)  आणि पूर्वी काही आजार असल्यास त्याची कागदपत्रे / मेडीकल रिपोर्ट्स सोबत आणावेत.

अधिक माहितीसाठी ९८५०१७११११/ ७५७५९८११११ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप आणि भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केले आहे.

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सांगवीमध्ये ५ ते ७ जानेवारी रोजी विनामूल्य अटल महाआरोग्य शिबीर दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सांगवीमध्ये ५ ते ७ जानेवारी रोजी विनामूल्य अटल महाआरोग्य शिबीर Reviewed by ANN news network on १२/२८/२०२३ ०९:४९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".