भारती विद्यापीठ आय.एम.ई.डी.चे नववर्षानिमीत्त अभियान
पुणे: भारती विद्यापीठ ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’ (आय.एम.ई.डी.) च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या (एन.एस.एस) वतीने आज ‘रस्ता सुरक्षा जनजागृती अभियाना’चे आयोजन करण्यात आले . या अभियातंर्गत दिनांक 3० डिसेंबर रोजी सकाळी १० ते १ या वेळेत शहरातील प्रमुख चौकांमध्ये महाविद्यालयातील एन.एस.एस विभागाच्या विद्यार्थ्यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि वाहतुक सुरक्षा विषयी संदेश असलेल्या २० हजार शुभेच्छा पत्रांचे वाटप केले.
या अभियानातंर्गत वाटण्यात येणारे ‘ शुभेच्छा पत्र’ मध्ये वाहतूक सुरक्षा याविषयी संदेश देण्यात आले आहेत. रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान शहरातील १५ प्रमुख चौकांमध्ये आयोजित करण्यात आले . चार चाकी वाहनात सीट बेल्ट लावणाऱ्या चालकांना तसेच हेल्मेट वापरणाऱ्या दुचाकी स्वारांना ५ हजार चॉकलेट वाटण्यात आली. अभियानाचे उद्घाटन ३० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता अलका टॉकीजजवळील टिळक चौकात भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विवेक सावजी,
आयएमईडीचे प्रभारी संचालक डॉ अजित मोरे, सहायक पोलिस आयुक्त सातव,भारती विद्यापीठाचे परिक्षा नियंत्रक डॉ. अँथनी, उप प्राचार्य डॉ रामचंद्र महाडिक, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ विजय फाळके आदी मान्यवरांचे उपस्थितीत करण्यात आले.भारती विद्यापीठ कुलपती डॉ शिवाजीराव कदम, कार्यवाह डॉ विश्वजित कदम यांचेही मार्गदर्शन या मोहिमेला लाभले .
डॉ. किर्ती गुप्ता, डॉ. श्वेता जोगळेकर, प्रा. दीप्ती देशमुख, डॉ. सुचेता कांची, डॉ. श्याम शुक्ला, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित हाेते. सर्व प्राध्यापक, विद्यार्थी सहभागी झाले.
रस्ता सुरक्षा जनजागृती विषयी शुभेच्छा पत्रांचे वाटप!
Reviewed by ANN news network
on
१२/३०/२०२३ ०८:२१:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
१२/३०/२०२३ ०८:२१:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: