● एकाच दिवशी २००० खेळाडूंमध्ये स्पर्धा, बॅटमिंटन, बास्केटबॉल, कबड्डी, फुटबॉल, कराटे आणि स्केटिंगमध्ये खेळाडूंची अभूतपूर्व कामगिरी
● बास्केटबॉल आणि फुटबॉलमध्ये अंदाजे ८०० खेळाडू सहभागी
पुणे : पुण्यातील एसएफए चॅम्पियनशीप्सच्या तिसऱ्या दिवशी श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सवर तरुण खेळाडूंनी बॅटमिंटन, बास्केटबॉल, कबड्डी, थ्रोबॉल, कराटे आणि टेनिसासारख्या विविध क्रीडास्पर्धांचा आनंद घेतला. त्यांचा सळसळता उत्साह आणि खेळाप्रती बांधिलकीनं वातावरण भारावून गेलं होते. चॅम्पियनशीपच्या मैदानात २००० पेक्षा जास्त खेळाडूंनी गुरुवारी त्यांच्या कौशल्याचे असामान्य प्रदर्शन घडवले.
अंडर- ७ क्वाड विभागात एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूलच्या इरा शाहजीहानने स्केटर म्हणून केलेला प्रेरणादायी प्रवास अथक जिद्द दर्शवणारा होता. तिने एसएफए चॅम्पियनशीप्सच्या तीन रेसेसमध्ये भाग घेत दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदक मिळवले. ऑक्टोबर २०२३ मध्येही इराने सीबीएसई स्टेट साउथ झोन चॅम्पियनशीप्समध्ये आपले कौशल्य दाखवत दोन ब्राँझ पदके मिळवली होती. ७ नोव्हेंबर २०२३ रोजी तिने आरएसएफआय राज्य कार्यक्रमात पुण्याचे प्रतिनिधीत्व करत आणखी दोन ब्राँझ पदके मिळवली. इराच्या संग्रहातील प्रत्येक पदक तिचे समर्पण, चिकाटी आणि क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्यासाठी लागणाऱ्या अजिंक्य वृत्तीची गोष्ट सांगणारे आहे.
एसएफए चॅम्पियनशीप देशातील तरुण खेळाडूंमध्ये खेळाची आवड तयार करण्यासाठी बांधील असून उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन उद्याचे कुशल खेळाडू घडवण्याचे ध्येय आहे.
तिसऱ्या दिवशीची सांगता आगामी क्रीडास्पर्धांच्या आतुरतेसह झाली. चौथ्या दिवशी अथलेटिक्स आणि बुद्धीबळाने सुरुवात होणार असून आणखी एक दिवस क्रीडास्पर्धांचा आनंद घेता येणार आहे.
दैनंदिन वेळापत्रक, पुण्याच्या दुसऱ्या एसएफए चॅम्पियनशीपमधील प्रत्येक क्रीडा स्पर्धेचा तपशीलवार निकाल आमच्या www.sfaplay.com अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
Reviewed by ANN news network
on
११/२५/२०२३ ०८:१७:०० PM
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: