मेजर ध्यानचंद हाॅकी स्टेडियम दोन महिन्यात पूर्ण होणार : विजयकुमार खोराटे

 


पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नेहरूनगर, पिंपरी येथील  उभारण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमचे काम प्रगतीपथावर असून ते येत्या डिसेंबर अखेर पूर्ण होणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी दिली.

 स्थापत्य क्रीडा विभागाच्या चालू असलेल्या कामांच्या स्थळांची  पाहणी  महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी केली तसेच इतर कामांची माहिती घेऊन उर्वरित कामे  लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अशा सूचनाही त्यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या.याभेटीदरम्यान त्यांचे समवेत सह शहर अभियंता मनोज सेठिया, कार्यकारी अभियंता हनुमंत  शिंदे आदी उपस्थित होते.

अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल,इंद्रायणीनगर या ठिकाणी भेट देऊन क्रीडांगणामधील लॉन टेनिसचे पूर्ण झालेल्या कामाची माहिती घेतली. त्या ठिकाणी सुरु  असलेल्या  थलॅटिक ट्रॅकबाबतची पाहणी करून लवकरात लवकर काम पूर्ण करणेबाबत संबंधितांना सूचना केल्या. तदनंतर भोसरीस.नं.१येथील क्रीडांगण संकुलमधील स्टेडियम गॅलरी चालू कामाची पाहणी करून पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण करून विविध खेळण्यासाठी मैदान उपलब्ध करून द्यावे तसेच कुस्ती प्रशिक्षण केंद्रामध्ये ठिकठीकाणी तैलचित्र लावणे अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या यावेळी कुस्ती प्रशिक्षक अजय लांडगे त्यांचे समवेत उपस्थित होते.

खेळाडूंसाठी निवासी व्यवस्थेबाबत उपस्थितां सोबत  चर्चा करण्यात आली असता त्याबाबत सकारात्मक योजना राबविण्याचे महापालिकेचे  नियोजन असल्याचे खोराटे यांनी सांगितले.

अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी बहिणाबाई चौधरी सर्पोद्यान व  प्राणीसंग्रहालयास भेट दिली. त्यावेळी उप आयुक्त संदीप खोत,पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.अरुण दगडे व त्यांचे सहकारी उपस्थित होते. त्यावेळी पूर्ण कामाचा आढावा व पुढील कामाची माहिती घेऊनसर्पोद्यान व  प्राणीसंग्रहालय सर्व नागरिकांना खुले करणेबाबत तातडीची कार्यवाही करणे बाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

स्वामी विवेकानंद क्रीडा संकुल कृष्णानगर येथील लॉन टेनिसच्या पूर्ण झालेल्या कामाची पाहणी करून  व रायफल शूटिंगच्या चालू कामाची माहिती  माहिती घेऊन सदरचे काम येत्या दोन महिन्यात पूर्ण करणेबाबत अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी संबंधितांना सूचना दिलेल्या आहेत.


मेजर ध्यानचंद हाॅकी स्टेडियम दोन महिन्यात पूर्ण होणार : विजयकुमार खोराटे मेजर ध्यानचंद हाॅकी स्टेडियम दोन महिन्यात पूर्ण होणार : विजयकुमार खोराटे Reviewed by ANN news network on ११/०६/२०२३ ०८:०९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".