दिघोडे येथील नवीन विद्युत उपकेंद्राचा मार्ग मोकळा; माजी जि.प. सदस्य वैजनाथ ठाकूर यांच्या प्रयत्नांना यश

 

शासनाची २०.१९ गुंठे जागा उरण महावितरणाला हस्तांतरित


विठ्ठल ममताबादे 
उरण : उरण तालुक्यातील दिघोडे येथे उरण पूर्व विभागासाठी नवीन विद्युत उपकेंद्र उभारण्यासाठी जागा उपलब्ध व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या राष्ट्र वादी काँग्रेस पक्ष अजीत दादा गटाचे उरण विधानसभा अध्यक्ष वैजनाथ ठाकूर यांना यश आले आहे. खासदार सुनिल तटकरे व महीला आणी बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांच्या सहकार्याने मौजे दिघोडे येथील शासकिय जागा सर्व्हे क्र. ११६ (६) क हि एकूण २०.१९ गुठे जागा महावितरणला हस्तांतरीत करण्यात आली. त्यामूळे उरण पूर्व विभात लवकरच नवीन विद्युत उपकेंद्र उभारला जावून विजेची समस्येपासून नागरिकांची सूटका होणार आहे.उरण तालुक्यातील करणाऱ्या पूर्व भागात एक नवीन विद्युत उपकेंद्र उभारण्यासाठी माजी  जिल्हा जिल्हा परिषद सदस्य व आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष अजीत दादा गटाचे उरण विधानसभा अध्यक्ष वैजनाथ ठाकूर व व माजी जि.प. सदस्या कुंदा वैजनाथ ठाकूर सातत्याने प्रयत्न करत होते. ते  खासदार सुनिल तटकरेंचे खंदे समर्थक आहेत. त्यामूळे या संदर्भात त्यांनी खासदार सुनिल  तटकरे तसेच महिला व बालकल्याण मंत्री अदितीताई तटकरे यांना निवेदन दिले होते. त्याचप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने पाठपूरावा केला व त्याचे यश त्यांना मिळाले असून मौजे दिघोडे येथील शासकिय जागा सर्वे क्र. ११६ (६) क. महावितरणला हस्तांतरीत करण्यात आली आहे.


वैजनाथ ठाकूर यांनी नवीन उपकेंद्राकरीता दिघोडे येथील प्रस्तावित आरोग्य केंद्राजवळील शासकीय जागा शोधली होती आणि त्या जागेवर उपकेंद्र बांधावे असे सुचविले होते. त्याबाबत त्यांनी नामदार आदिती तटकरे आणि खासदार सुनील तटकरे यांची भेट घेतली. आदिती तटकरे यांनी पहिल्या टर्म मध्ये राज्य मंत्री असताना हि जागा महावितरणला हस्तांतरीत करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले होते. तरी देखील विलंब होत असल्याने त्यांनी खासदार सुनील तटकरे यांच्याकडे हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अशी मागणी केली होती.

उरण तालुक्यातील पूर्वविभागाला वीज पुरवठा विद्युत वाहिनीचे सवस्टेशनपासून अंतर तारा ४० किलोमिटर एवढे आहे या वीज वाहिन्या खाडीतील चिखल, दलदल आणि झाडा झुडपातून येत असल्यामुळे रोज तारा तुटून किंवा शॉर्ट सर्किट होवून विज खंडित होत होती . त्यामूळे या वाहिन्यांची दुरुस्ती करणे जिकरीचे बनले आहे. त्यावर उपाय योजना म्हणून उरण पूर्व भागासाठी नवीन सबस्टेशन उभारले पाहिजे असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यावर वैजनाथ ठाकूर यासाठी सातत्याने प्रयत्न केले. आणी त्याला यश येवून दिघोडे येथिल सर्व्हे क्र. ११६ (६) क येथील जागा महावितरणाला हस्तांतरित करण्यात आली आहे.

या सबस्टेशनमूळे ग्रामपंचायत विंधणे मधील गावे,भोम, चिरनेर,कळंबुसरे, मोठी जुई या गावांना याचा फायदा होणार असून, लवकरच यातील चिरनेर, विंधणे, कंठवली, कळंबुसरे सारख्या पुरग्रस्त गावांना पुराच्या वेळी विजेच्या समस्येला देखील तोंड द्यावे लागत होते ती समस्या देखील आता मार्गी लागणार आहे., काही वर्षांपूर्वी चिरनेर येथी पुरात एक गरिब दांपत्य विजेच्या झटक्याने मृत्यूमुखी पडले होते. त्यामूळे लवकरच या गावांना जमिनीखालून विद्यूत वाहीन्या देखील टाकण्यात येणार आहेत. त्यामूळे वैजनाथ ठाकूर यांचे हे काम जनतेच्या कायम लक्षात राहणार आहे.
दिघोडे येथील नवीन विद्युत उपकेंद्राचा मार्ग मोकळा; माजी जि.प. सदस्य वैजनाथ ठाकूर यांच्या प्रयत्नांना यश दिघोडे येथील नवीन विद्युत उपकेंद्राचा मार्ग मोकळा; माजी जि.प. सदस्य वैजनाथ ठाकूर यांच्या प्रयत्नांना यश Reviewed by ANN news network on ११/१७/२०२३ ०९:११:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".