एयर इंडियाची अलास्का एयरलाइन्ससह इंटरलाइन भागिदारी

 


अमेरिकामेक्सिको आणि कॅनडातील ३२ ठिकाणी आणि त्या ठिकाणांपर्यंत विमानसेवा

 

गुरुग्राम :  एयर इंडिया या भारतातील आघाडीच्या जागतिक विमानसेवा कंपनीने अलास्का एयरलाइन्सबरोबर इंटरलाइन भागिदारी केली आहे. या भागिदारीमुळे एयर इंडियाचे आंतरराष्ट्रीय नेटवर्क मजबूत होणार असून कंपनीच्या प्रवाशांना न्यूयॉर्क जेएफके, नेवार्क- न्यू जर्सीवॉशिंग्टन डीसीशिकागोसॅन फ्रान्सिस्को आणि व्हॅन्कुवरपासून अलास्का एयरलाइनच्या नेटवर्कमधील ३२ ठिकाणांपर्यंत आणि या ठिकाणांपासून सफाईदार सेवेचा आनंद घेता येणार आहे.

या कराराअंतर्गत उभयपक्षी इंटरलायनिंगचा समावेश करण्यात आला असून त्यामुळे दोन्ही कंपन्यांना एकमेकांच्या नेटवर्कवर तिकिटांची विक्री करता येणार आहे. त्याशिवाय दोन्ही कंपन्यांनी खास प्रोरेट करार केला आहेज्यामुळे एयर इंडियाला अलास्का एयरलाइन्सच्या नेटवर्कमधील मार्गांवर थ्रुफेअर फाइल करता येणार आहे. प्रवाशांना अलास्का एयरलाइन्सच्या मार्गांवर मोफत बॅगेज अलावन्सचाही आनंद घेता येणार आहे.

 

एयर इंडियाचे प्रमुख कमर्शियल आणि ट्रान्सफर्मेशन अधिकारी निपुण अगरवाल म्हणाले, अलास्का एयरसह करण्यात आलेल्या करारामुळे अमेरिका व कॅनडामधील आमचे अस्तित्व विस्तारेल तसेच मेक्सिकोपर्यंत आमच्या सेवेची व्याप्ती वाढून नेटवर्क विस्ताराच्या योजनेला बळ मिळेल. यामुळे आमच्या प्रवाशांना जास्त पर्याय मिळणार असून हा करार कनेक्टिव्हिटी विस्तारण्याच्या आमच्या मिशनमधील महत्त्वाचा टप्पा ठरेल.

 

प्रवाशांना एयर इंडियाच्या उत्तर अमेरिकेतील सध्याच्या गेटवेवरून अलास्का एयरलाइन्स नेटवर्कच्या पुढील पॉइंट्सवर कनेक्ट होता येईल -

      न्यूयॉर्क जेएफके पोर्टलँडसॅन दिएगोसिएटल

      नेवार्क न्यू जर्सी लॉस एंजेलिस, पोर्टलँडसॅन दिएगोसिएटल

      शिकागोपोर्टलँड, सिएटलअँकरेजबॉइस

      वॉशिंग्टन डीसी लॉस एंजेलिससॅन दिएगोसिएटल

      सॅन फ्रान्सिस्को अमेरिकेत २६ पॉइंट्स आणि मेक्सिकोमध्ये ६

 

      अमेरिकासॉल्ट लेक सिटी, ऑरेंज काउंटीतांपाअँकरेजऑस्टिनबॉइसबोझेमन यलोस्टोनडल्लास लव्ह फील्ड रिगन नॅशनल फोर्ट लॉडरडेलस्पोकेनहोनोलुलुजॅक्सन होललास व्हेगसलॉस एंजेलिसओरलँडोमिसोला मोंटानाकाहुलुईसिएटल पेन फील्डपोर्टलफिनिक्सपाम स्प्रिंग्जरेमंडसॅन दिएगो, सिएटल. 

      मेक्सिको: लॉस काबोसइक्सतापा झिउतानेहोलोरेटो इंटरनॅशनलमाझात्लानपोर्तो व्हालार्ता

      व्हॅन्कुवर: सिएटल

 

एयर इंडियातर्फे सध्या दिल्लीबेंगळुरू आणि मुंबईवरून अमेरिकेतील न्यूयॉर्कनेवार्कवॉशिंग्टन डीसी, शिकागो आणि सॅन फ्रान्सिस्को या पाच ठिकाणी दर आठवड्याला ४७ विनाथांबा विमानसेवा चालवली जातेतर दिल्ली ते टोरँटो आणि कॅनडातील व्हॅन्कुवर येथे दर आठवड्याला १४ विनाथांबा विमानसेवा चालवली जाते.

एयर इंडियाची अलास्का एयरलाइन्ससह इंटरलाइन भागिदारी एयर इंडियाची अलास्का एयरलाइन्ससह इंटरलाइन भागिदारी Reviewed by ANN news network on ११/०५/२०२३ ०६:४२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".